लाज घालवून बसलेल्या मोहम्मद रिझवानला बिग बॅश लीग स्पर्धेत किती पैसे मिळतात? जाणून घ्या

बिग बॅश लीग स्पर्धेत मोहम्मद रिझवानने पाकिस्तानचं नाक कापलं. टी20 लीग स्पर्धेत आक्रमक खेळी ऐवजी कसोटी स्ट्राईक रेटने धावा केल्या. सिडनी थंडर्सविरूद्धच्या सामन्यात तर कहरच केला. त्यामुळे वैतागून कर्णधाराने त्याला डगआऊटमध्ये बोलवलं. जाणून घ्या बिग बॅश लीगमध्ये त्याला किती पैसे मिळतात ते...

| Updated on: Jan 12, 2026 | 7:53 PM
1 / 5
बिग बॅश लीग 2025-26 स्पर्धेत मोहम्मद रिझवान मेलबर्न रेनीगेड्स संघाकडून खेळत आहे. पण त्याची या स्पर्धेतील कामगिरी सुमार राहिली आहे. त्याचा प्रत्यय सिडनी थंडर विरूद्धच्या सामन्यात आला. त्यामुळे त्याला या सामन्यात रिटायर्ड आऊट घोषित केलं. पाकिस्तानच्या खेळाडूसोबत टी20 क्रिकेटमध्ये असं पहिल्यांदाच घडलं. (फोटो-GETTY IMAGES)

2 / 5
मोहम्मद रिझवानने या सामन्यात धीम्या गतीने फलंदाजी केल्याने त्याला रिटायर्ड आऊट घोषित केलं गेलं. त्याने या सामन्यात 23 चेंडूत 26 धावा केल्या. जवळपास चार षटकं एकटाच खेोळला. त्यामुळे मेलबर्न रेनिगेड्सच्या कर्णधार विल सदरलँडने त्याला रिटायर्ड हर्ट केलं. (फोटो-GETTY IMAGES)

3 / 5
मोहम्मद रिझवान पाकिस्तानचा टॉप फलंदाज आहे. त्याच्यासोबत असं घडल्याने पाकिस्तानी क्रिकेट चाहत्यांचा संताप झाला. त्यांनी या प्रकरणी सोशल मीडियावर टीकेची झोड उठवली आहे. पण यामुळे त्याचा खेळ सुधारेल असं तर होऊ शकत नाही. असं असताना त्याला बिग बॅश लीगमधून  किती पैसे मिळतात ते जाणून घ्या. (फोटो-GETTY IMAGES)

4 / 5
मोहम्मद रिझवानला बिग बॅश लीग स्पर्धेतून 3 लाख 70 हजार डॉलर म्हणजेच 5 कोटीहून अधिक पाकिस्तानी रुपये दिले आहेत. पण इतके पैसे मोजूनही मोहम्मद रिझवान प्रत्येक सामन्यात फेल गेला आहे. त्याने 8 सामन्यात 20.8 च्या स्ट्राईक रेटने 167 धावा केल्या आहे. त्याचा स्ट्राईक रेट 101 आहे. (फोटो-GETTY IMAGES)

5 / 5
मोहम्मद रिझवान पहिल्यांदाच बिग बॅश लीग स्पर्धेत खेळत आहे. या स्पर्धेत त्याची सुमार कामगिरी पाहता त्याला टी20 वर्ल्डकप संघात स्थान मिळणं कठीण झालं आहे. दुसरीकडे, मोहम्मद रिझवानसारखीच बाबर आझमची स्थिती आहे. (फोटो-GETTY IMAGES)