
आयसीसीने वनडे वर्ल्ड कपनंतर 5 मोठे निर्णय घेतले आहेत. यापैकी काही बाबतीत बदलही केला आहे. ट्रान्सजेंडर खेळाडूंना वूमन्स क्रिकेटमध्ये खेळता येणार नाही.

आयसीसीने वर्ल्ड कप 2023 दरम्यान श्रीलंका क्रिकेट बोर्ड बरखास्त करण्यात आलं होतं. मात्र त्यानंतरही श्रीलंकेला आंतरराष्ट्रीय सामने खेळता येणार आहे. आयसीसीनेच ही परवानगी दिली आहे.

जानेवारी 2024 मध्ये अंडर 19 वर्ल्ड कप स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे. आयसीसीने या स्पर्धेचं आयोजन हे श्रीलंकेहून दक्षिण आफ्रिकेत केलं आहे. आयसीसीने श्रीलंकेकडे असलेलं यजमानपद काढून घेत तो मान दक्षिण आफ्रिकेला दिला आहे.

आयसीसीने उशिराने का होईना पण समान काम समान वेतन हे धोरण स्वीकारलं आहे. आता महिला पंचांनाही पुरुष पंचाना मिळतं तितकंच वेतन मिळणार आहे.

वर्ल्ड कप 2023 मध्ये बांगलादेश विरुद्धच्या सामन्यात श्रीलंकेच्या अँजलो मॅथ्यूज याला टाईम आऊट घोषित करण्यात आलं होतं. यावरुन चांगलाच वाद पेटला होता. नियमानुसार, विकेट गेल्यानंतर पुढील फलंदाजाने 2 मिनिटात बॅटिंगसाठी मैदानात खेळण्यासाठी तयार असावं लागतं. मात्र तसा नियम गोलंदाजांसाठी नव्हता. आता आयसीसीने गोलंदाजांसाठीही तसा निर्णय केलाय. पुढील ओव्हर 60 सेकंदात टाकणं अनिर्वाय करण्यात आलं आहे. संबंधित टीमला पंचांकडून 2 वेळा या नियमांचं उलंलघन केल्यास सांगितलं जाईल. मात्र तिसऱ्यांदा अशी चूक झाल्यास प्रतिस्पर्धी संघाला 5 धावा दिल्या जातील.