
उदय सहारन याच्या नेतृत्वात टीम इंडिया अंडर 19 वर्ल्ड कप 2024 उपविजेता ठरला. टीम इंडियाचं विश्व विजेता होण्याचं स्वप्न भंगलं. तर ऑस्ट्रेलिया वर्ल्ड चॅम्पियन ठरली.

टीम इंडिया सलग 6 सामने जिंकत फायनलमध्ये पोहचली. उदयच्या नेतृत्वात टीम इंडियाने उल्लेखनीय कामगिरी केली.या निमित्ताने उदय सहारन नक्की कोण आहे? उदय सहारन याचा इथवरचा प्रवास कसा राहिला, हे आपण जाणून घेऊयात.

उदयचा जन्म 2004 साली राजस्थानमधील श्रीगंगानगर येथे झाला. उदय सहारन क्रिकेटमुळे वयाच्या 12 वर्षी पंजाबला आला. उदयमुळे संपूर्ण कुंटुंबाला भटिंडाला यावं लागलं.

उदय पंजाबला आल्यानंतर त्याने अंडर 14, 16 आणि 19 टीमसाठी खेळला. उदयला घरातूनच क्रिकेटचे बाळकडू मिळाले. उदयचे वडील हे कोच असल्याने त्याला बरेचसे छक्के पंजे माहित झाले.

उदयला आपल्या नेतृत्वात टीम इंडियाला वर्ल्ड चॅम्पियन करता आलं नाही. मात्र त्याने टीम इंडियाला तिथवर पोहचवण्यासाठी कठोर परिश्रम घेतले.