
भारतीय महिला संघाने वनडे वर्ल्ड कप जिंकत इतिहास घडवला. भारताने तिसऱ्या प्रयत्नात वर्ल्ड कप ट्रॉफीवर नाव कोरलं. भारतीय संघाने बॅटिंग, बॉलिंग आणि फिल्डिंग या तिन्ही आघाड्यांवर चमकदार कामगिरी करत पहिलावहिला वर्ल्ड कप मिळवला. टीम इंडियाने वर्ल्ड कप जिंकल्याने त्याचा अनेक बाबींवर सकारात्मक परिणाम झाला. या वनडे वर्ल्ड कप स्पर्धेला डीजीटल प्लॅटफॉर्मवर 45 कोटी व्हीव्यूज मिळाले. (Photo Credit : PTI)

टीम इंडिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यातील अंतिम सामन्याला रेकॉर्डब्रेक व्हीव्यूज मिळाले. या सामन्याला जवळपास 21 कोटी व्हीव्यूज मिळाले. जवळपास इतकेच व्हीव्यूज टी 20I वर्ल्ड कप 2024 च्या फायलनला मिळाले होते. (Photo Credit : PTI)

वूमन्स वर्ल्ड कप स्पर्धेतील महाअंतिम सामना असंख्य चाहत्यांनी टीव्हीवरही पाहिला. महाअंतिम सामन्याला 9.2 कोटी व्हीव्यूज मिळाले. हे आकडे टी 20 वर्ल्ड कप फायनल आणि वर्ल्ड कप फायनल 2023 च्या इतकेच आहेत. (Photo Credit : PTI)

वर्ल्ड कप विजयानंतर भारतीय महिला संघातील खेळाडूंवर बक्षिसाचा वर्षाव केला जात आहे. स्मृती मंधाना जेमीमा रॉड्रिग्स आणि राधा यादव या तिघींना महाराष्ट्र सरकारकडून प्रत्यकेी सव्वा 2 कोटी रुपये देण्यात आले. तसेच श्री चरणी हीला आंध्र प्रदेश सरकारकडून अडीच कोटी आणि भूखंड देण्यात आला. (Photo Credit : PTI)

वर्ल्ड कप विजयामुळे आता वूमन्स क्रिकेटला आणखी चालना मिळेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे. त्यामुळे आगामी वुमन्स प्रीमियर लीग स्पर्धेतील व्हीव्यूअरशीपच्या आकड्यात वाढ झाल्यास बीसीसीआयला चांगलाच आर्थिक फायदा होऊ शकतो. (Photo Credit : PTI)