IND vs AFG: भारतीय संघाच्या नव्या टी20 मालिकेची घोषणा, असं असेल वेळापत्रक

भारतीय संघ आता श्रीलंकेत असून कसोटी मालिकेसाठी तयारी करत आहे. असं असताना नव्या टी20 मालिकेचं वेळापत्रक जाहीर करण्यात आलं आहे. अफगाणिस्तानविरुद्ध तीन सामन्यांची टी20 मालिका होणार आहे.

| Updated on: Aug 12, 2026 | 9:49 AM
1 / 5
भारत आणि अफगाणिस्तान पुन्हा एकदा आमनेसामने असणार आहे. कसोटी आणि वनडे मालिकेनंतर पुन्हा एकदा टी20 मालिकेसाठी टीम इंडिया सज्ज झाली आहे. दोन्ही संघांमध्ये तीन सामन्यांच्या टी20 मालिकेला 13 सप्टेंबरपासून सुरूवात होणार आहे. (Photo: BCCI Twitter)

2 / 5
अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाने टी20 मालिकेसाठी वेळापत्रक जाहीर केलं आहे. पहिला टी20 सामना 13 सप्टेंबरला होणार आहे. दुसरा टी20 सामना 15 सप्टेंबरला, तर तिसरा टी20 सामना 17 सप्टेंबरला होणार आहे. (Photo: PTI)

3 / 5
मालिकेतील तिन्ही टी20 सामने नवी दिल्लीच्या अरुण जेटली मैदानात खेळले जाणार हे विशेष.. या मालिकेचं आयोजक अफगाणिस्तान क्रिकेट बोर्ड आहे. (Photo: BCCI Twitter)

4 / 5
अफगाणिस्तानमधील स्थिती पाहता सध्या अफगाणिस्तानात कोणत्याच स्पर्धांचं आयोजन होत नाही. त्यामुळे भारतीय संघही तिथे जाणं शक्य नाही. त्यामुळे अफगाणिस्तान क्रिकेट बोर्ड दिल्लीत या मालिकेचं आयोजन करत आहे. (Photo: BCCI Twitter)

5 / 5
अफगाणिस्तानविरुद्धची टी20 मालिका टीम इंडियासाठी खूपच महत्त्वाची असणार आहे. कारण इंग्लंड आणि आयर्लंडविरुद्धच्या मालिकेत भारताला पराभवाचं तोंड पाहावं लागलं होतं. त्यानंतर झिम्बाब्वेविरुद्ध भारताने कमबॅक केलं. आता पुन्हा एकदा श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाचा कस लागणार आहे. (Photo: BCCI Twitter)

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us