IND vs AFG: टीम इंडिया मोठ्या विजयानंतरही विंडीज-पाकिस्तानचा रेकॉर्ड ब्रेक करण्यात अपयशी

Indian Cricket Team : शुबमन गिल याच्या नेतृत्वात टीम इंडियाच्या युवा ब्रिगेडने अडीच दिवसांतच अफगाणिस्तान विरुद्धचा एकमेव कसोटी सामना जिंकला. टीम इंडियाने अफगाणिस्तानवर 300 धावांनी विजय मिळवला. मात्र टीम इंडियाची पाकिस्तान आणि विंडीजचा रेकॉर्ड ब्रेक करण्याची संधी हुकली. जाणून घ्या विंडीज-पाकिस्तानच्या नावावर असलेल्या विक्रमबाबत.

| Updated on: Jun 08, 2026 | 6:47 PM
1 / 5
भारतीय क्रिकेट संघाने सोमवारी 8 जून रोजी अफगाणिस्तानवर एकमेव कसोटी सामन्यातील तिसऱ्या दिवशी डाव आणि 300 धावांनी विजय मिळवला. टीम इंडियाचा हा कसोटी क्रिकेटमधील सर्वात मोठा विजय ठरला. (Photo Credit: PTI)

2 / 5
टीम इंडियाने अफगाणिस्तानला पहिल्या डावात 152 धावांवर गुंडाळून फॉलोऑन दिला. टीम इंडियाने अफगाणिस्तानला दुसऱ्या डावात 112 रन्सवर ऑलआऊट केलं. भारताने अशाप्रकारे विजय मिळवला.  (Photo Credit: PTI)

3 / 5
टीम इंडियाचा डावाने मिळवलेला हा सर्वात मोठा विजय ठरला. टीम इंडियाने याआधी विंडीजला 2018 साली डाव आणि 272 धावांनी पराभूत केलं होतं. (Photo Credit: PTI)

4 / 5
टीम इंडिया या विजयानंतरही मोठा विक्रम मोडीत काढण्यात अपयशी ठरली. त्यामुळे पाकिस्तान आणि वेस्ट इंडिजचा रेकॉर्ड कायम राहिला. (Photo Credit: PTI)

5 / 5
भारतात कसोटीत सर्वात मोठ्या फरकाने विजय मिळवण्याचा विक्रम हा वेस्ट इंडिजच्या नावावर आहे. वेस्ट इंडिजने इंग्लंडला कोलकातामध्ये 336 धावांनी पराभूत केलं होतं. तर आशियाई संघांमध्ये पाकिस्तानच्या नावावर डाव आणि सर्वाधिक धावांनी विजयाचा विक्रम आहे. पाकिस्तानने 2002 साली न्यूझीलंडला डाव आणि 324 धावांनी पराभूत केलं होतं. (Photo Credit: Getty Images)

Follow Us