
तिसऱ्या वनडेआधी पीचबाबत मोठा अपडेट समोर आलीय. मालिकेच्या पहिल्या दोन्ही मॅचमध्ये पीचकडून फलंदाजांना मदत झाली नाही. मीडिया रिपोर्ट्सनुसार, एमए चिदंबरम स्टेडियमची खेळपट्टी फलंदाजांसाठी मदतशीर आहे. तसेच पीचवरी गवतामुळे गोलंदाजांनाही मदत होणार आहे.

एम ए चिदंबरम स्टेडियममध्ये क्रिकेट चाहत्यांना हायस्कोअरिंग सामना पाहायला मिळू शकतो. टॉस जिंकून पहिले बॉलिंग करण्याचा निर्णय योग्य ठरू शकतो.

मालिकेतील पहिला सामना मुंबई आणि दुसरी मॅच विशाखापट्टनम मध्ये खेळवण्यात आला. या दोन्ही सामन्यात एकाही टीमला 200 पेक्षा अधिक धावा करता आल्या नाहीत. ऑस्ट्रेलियाला पहिल्या तर टीम इंडियाला दुसऱ्या सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला.

या तिसऱ्या वनडे सामन्याला दुपारी 1 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होणार आहे. तर 1 वाजता टॉस होणार आहे.

तिसऱ्या सामन्यात पाऊस होण्याची तीव्र शक्यता आहे. चेन्नईत सोमवारी मुसळधार पाऊस झाला. मंगळवारीही पावसाची शक्यता आहे. त्यामुळे या सामन्यावर पावसाचं सावट आहे.