सूर्यकुमार यादवच्या शिरपेचात मानाचा तुरा, दोन षटकार मारत नोंदवला विक्रम

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पहिला टी20 सामना पावसामुळे रद्द झाला. पण भारताचा कर्णधार सूर्यकुमार यादव याने एका मोठ्या विक्रमाची नोंद केली आहे. टी20 क्रिकेट कारकि‍र्दीत नव्या विक्रमाला गवसणी घातली आहे.

| Updated on: Oct 29, 2025 | 5:13 PM
1 / 5
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात पाच सामन्यांची टी20 मालिका सुरु झाली आहे. या मालिकेतील पहिला सामना पावसामुळे रद्द करण्यात आला. मात्र या सामन्यात भारताचा कर्णधार सूर्यकुमार यादव याने विक्रम रचला आहे. दुसरीकडे, सूर्याने या सामन्यात 30हून अधिक धावा करत फॉर्मात परतल्याचे संकेत दिले आहेत. (Photo- BCCI Twitter)

2 / 5
भारताने नाणेफेकीचा कौल गमावला आणि प्रथम फलंदाजी वाटेला आली. या सामन्यात अभिषेक शर्मा 19 धावा करून बाद झाला. त्यानंतर सूर्यकुमार यादव मैदानात आला आणि आक्रमक खेळी केली. त्याने 24 चेंडूत 3 चौकार आणि 2 षटकार मारत 39 धावा केल्या. (Photo- BCCI Twitter)

3 / 5
सूर्यकुमार यादवने दोन षटकार मारताच विक्रमाला गवसणी घातली आहे. सूर्यकुमार यादवने टी20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 150 षटकार पूर्ण केले आहेत. कर्णधार सूर्यकुमार यादवने दोन उत्तुंग षटकार मारले आणि विक्रम नावावर केला. (Photo- BCCI Twitter)

4 / 5
सूर्यकुमार यादव  अशी कामगिरी करणारा जगातील पाचवा फलंदाज आहे. तर भारताचा दुसरा फलंदाज आहे. या यादीत रोहित शर्मा पहिल्या स्थानावर आहे. त्याने 205 षटकार मारले आहेत. मुहम्मद वसीमने 187, मार्टिन गप्टीलने 173, जोस बटरलने 172 षटकार मारले आहेत. (Photo- BCCI Twitter)

5 / 5
सूर्यकुमारने फक्त 86 डावांमध्ये 150 षटकारांचा पल्ला गाठला आहे. तर रोहितने 111 डावांमध्ये हा टप्पा गाठला होता.यामुळे भारतासाठी टी20त 150 षटकार मारणारा सर्वात जलद फलंदाज बनला आहे. टी20 क्रिकेटमध्ये सर्वात जलद 150 षटकार मारण्याचा विक्रम संयुक्त अरब अमिरातीच्या मोहम्मद वसीमच्या नावावर आहे. त्याने 66 डावात ही कामगिरी केली. (Photo- BCCI Twitter)