
टीम इंडियाने बांगलादेशला पहिल्या कसोटी सामन्यात विजयासाठी 515 धावांचं आव्हान दिलं आहे. भारताने पहिला डाव हा 4 बाद 274 धावांवर घोषित केला. भारतासाठी शुबमन गिल आणि ऋषभ पंत या जोडीने शतकी खेळी केली. (Photo Credit : Bcci)

भारताचा कर्णधार रोहित शर्मा या सामन्यातील दोन्ही डावात अपयशी ठरला. रोहितने अनुक्रमे 5 आणि 6 अशा धावा केल्या. मात्र त्यानंतरही रोहितने या नंतरही एक खास विक्रम केला आहे. (Photo Credit : Bcci)

रोहितने 2024 या वर्षात 1 हजार आंतरराष्ट्रीय धावा पूर्ण केल्या आहेत. रोहित अशी कामगिरी करणारा पहिलाच कर्णधार ठरला आहे. रोहितची कर्णधार म्हणून 1 हजार आंतरराष्ट्रीय धावा करण्याची ही दुसरी वेळ ठरली आहे. (Photo Credit : Bcci)

रोहितने टीम इंडियासाठी फलंदाज या नात्याने 10 वेळा एका वर्षात 1 हजार किंवा त्यापेक्षा अधिक धावा करण्याचा कारनामा केला आहे. याबाबतीत सचिन तेंडुलकर अव्वल स्थानी आहे. (Photo Credit : Bcci)

दरम्यान टीम इंडियाने आर अश्विन याच्या शतकी खेळीच्या जोरावर पहिल्या डावात 376 धावा केल्या. त्यानंतर बांगलादेशला 149 धावांवर गुंडाळून 227 धावांची आघाडी घेतली. त्यानंतर 274 धावांवर दुसरा डाव घोषित केला. त्यामुळे बांगलादेशला 515 धावांचं आव्हान मिळालं आहे. (Photo Credit : Bcci)

टीम इंडिया प्लेइंग ईलेव्हन : रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जयस्वाल, शुबमन गिल, विराट कोहली, केएल राहुल, ऋषभ पंत (विकेटकीपर), रवींद्र जडेजा, रवीचंद्रन अश्विन, जसप्रीत बुमराह, आकाश दीप आणि मोहम्मद सिराज. (Photo Credit : Bcci)

बांगलादेश प्लेइंग ईलेव्हन : नजमुल हुसेन शांतो (कॅप्टन), शादमान इस्लाम, झाकीर हसन, मोमिनुल हक, मुशफिकुर रहीम, शाकीब अल हसन, लिटन दास (विकेटकीपर), मेहदी हसन मिराझ, तस्किन अहमद, हसन महमूद आणि नाहिद राणा. (Photo Credit : Bcci)