
भारताने पहिल्या डावात 396 धावांची खेळी केली होती. सकाळी डाव आटोपला आणि इंग्लंडचा संघ फलंदाजीसाठी आला. इंग्लंडने बेझबॉल रणनिती अवलंबत आक्रमक सुरुवात केली. पण इंग्लंडचा संपूर्ण संघ अवघ्या 253 धावांवर तंबूत परतला.

जसप्रीत बुमराहने इंग्लंडचा निम्म्याहून अधिक संघ तंबूत पाठवला. जसप्रीत बुमराहने इंग्लंडचे सहा गडी बाद केले. यासह जसप्रीत बुमराहच्या नावावर आणखी एका विक्रमाची नोंद झाली आहे.

बुमराहने ऑली पोप, जो रूट, जॉनी बेअरस्टो, बेन स्टोक्स, टॉम हार्टली आणि जेम्स अँडरसन यांना पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. बुमराहने कसोटीत 10व्यांदा 5 विकेट घेण्याचा मोठा पराक्रम केला.

भारताकडून कसोटीत कमी चेंडूत 150 विकेट घेणारा गोलंदाज ठरला आहे. जसप्रीत बुमराहने 6781 चेंडूत 150 विकेट्स घेतले. तर उमेश यादवने 7761 चेंडूत 150 विकेट्स, मोहम्मद शमीने 7755 चेंडूत 150, तर कपिल देवने 8378 चेंडूत 150 विकेट्स घेतले आहेत.

बुमराह सर्वात वेगवान 150 बळी घेणारा दुसरा आशियाई गोलंदाज ठरला आहे. वकार युनूस या यादीत पहिल्या क्रमांकावर आहे. बुमराहने 34 कसोटीत 150 बळी पूर्ण केले आहेत. तर युनूसने केवळ 27 कसोटीत 150 बळी घेतले.

जसप्रीत बुमराहच्या नावावर 20.40 च्या सरासरीने 151 विकेट आहेत. कसोटी क्रिकेटच्या 147 वर्षांच्या इतिहासात केवळ दोनच गोलंदाजांनी त्याच्यापेक्षा चांगल्या सरासरीने जास्त विकेट्स घेतल्या आहेत. 16.43 च्या सरासरीने सिडनी बार्न्स आणि 20.53 च्या सरासरीने एलन डेव्हिडन यांनी विकेट्स घेतल्या आहेत.