IND vs IRE: रोहित शर्माची धमाकेदार सुरुवात, आयर्लंड विरुद्ध रचला इतिहास, तब्बल इतके रेकॉर्ड्स

Rohit Sharma: हिटमॅन रोहित शर्माने आयर्लंड विरुद्ध टी 20 वर्ल्ड कप 2024 स्पर्धेत अर्धशतक ठोकत टीम इंडियाच्या विजयात महत्तवपूर्ण भूमिका बजावली. रोहितने या सामन्यात 4 रेकॉर्ड्स केले.

| Updated on: Jun 06, 2024 | 4:09 PM
1 / 6
टीम इंडियाने आयर्लंडला पराभूत करत आयसीसी टी 20 वर्ल्ड कप 2024 स्पर्धेत विजयी सुरुवात केली. टीम इंडियाने आयर्लंडवर 8 विकेट्सने विजय मिळवला.  विजयासाठी मिळालेलं 97 धावांचं आव्हान हे 2 विकेट्सच्या मोबदल्यात पूर्ण केलं.

2 / 6
टीम इंडियाचा कॅप्टन रोहित शर्मा हा विजयाचा शिल्पकार ठरला. रोहितने 52 धावांची खेळी केली. रोहितने या खेळी दरम्यान 3 सिक्स आणि 4 चौकार ठोकले. रोहितने या अर्धशतकी खेळी आणि टीम इंडियाच्या विजयासह अनेक विक्रम केले.

3 / 6
रोहितने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 600 सिक्सचा टप्पा पूर्ण केला. रोहित अशी कामगिरी करणारा पहिला फलंदाज ठरला. रोहितने वनडे, टी 20 आणि टेस्ट या तिन्ही फॉर्मेटमध्ये अनुक्रमे 323,193 आणि 84 षटकार ठोकले आहेत.

4 / 6
रोहितने 52 धावांच्या अर्धशतकी खेळीसह टी 20 क्रिकेटमध्ये 4 आणि टी 20 वर्ल्ड कप स्पर्धेत एकूण 1 हजार धावांचा टप्पा गाठला.

5 / 6
टीम इंडियाचा आयर्लंड विरुद्धचा हा एकूण आठवा विजय ठरला. रोहितच्या कॅप्टन्सीत टीम इंडियाचा हा टी 20 मधील 43 वा विजय ठरला. रोहितने यासह महेंद्रसिंह धोनीचा 42 टी 20 विजयांचा रेकॉर्ड ब्रेक केला.

6 / 6
दरम्यान टीम इंडिया वर्ल्ड कपमधील आपला दुसरा सामना हा पाकिस्तान विरुद्ध खेळणार आहे. हा सामना रविवारी 9 जून रोजी होणार आहे.