
टीम इंडियाने पाकिस्तानचा टप्प्यात कार्यक्रम केला आहे. टॉस गमावून बॅटिंगला आलेल्या पाकिस्तानला टीम इंडियाच्या बॉलिंगसमोर ऑलआऊट 191 धावाच करता आल्या. टीम इंडियाच्या 5 गोलंदाजांनी प्रत्येकी 2 विकेट्स घेत पाकड्यांना चारीमुंड्या चित केलं.

जसप्रीत बुमराह याने 7 ओव्हरमध्ये 19 धावांच्या मोबदल्यात 2 विकेट्स घेतल्या. बुमराहने मोहम्मद रिझवान आणि शादाब खान या दोघांना गुंडाळलं.

उपकर्णधार हार्दिक पंड्या याने आपल्या घरच्या मैदानात 6 ओव्हरमध्ये 34 धावा देत 2 विकेट्स घेतल्या. हार्दिकने इमाम उल हक आणि मोहम्मद नवाझ या दोघांना आऊट केलं.

कुलदीप यादव याने गेमचेंजिंग ओव्हर टाकली. कुलदीपने एकाच ओव्हरमध्ये सौद शकील आणि इफ्तिखार अहमद या दोघांचा 'टप्प्यात' कार्यक्रम केला. कुलदीपने 10 ओव्हरमध्ये 35 धावा देत 2 विकेट्स मिळवल्या.

लोकल बॉय रविंद्र जडेजा याने 9.5 ओव्हरमध्ये 38 धावा खर्चुन 2 फलंदाजाची विकेट घेतली. जड्डूने हसन अली आणि हरीस रौफ या दोघांना मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला.

तर आयसीसी रँकिंगमधील नंबर 1 बॉलर मोहम्मद सिराज याने 8 ओव्हरमध्ये 2 विकेट्स घेतल्या. सिराजने नंबर 1 बॅट्समन पाकिस्तानचा कॅप्टन बाबर आझम आणि अब्दुल्लाह शफीक यादोघांना माघारी पाठवलं.