
टीम इंडियाने पाकिस्तानला 7 विकेट्सने पराभूत केलं. टीम इंडिया वनडे वर्ल्ड कप 2023 मधील सलग तिसरा विजय ठरला. टीम इंडियाने याआधीच्या दोन सामन्यात ऑस्ट्रेलिया आणि अफगाणिस्तानला उपट दिली.

पाकिस्ताने 42.5 ओव्हरमध्ये ऑलआऊट 191 धावा केल्या. टीम इंडियाला 192 धावांचं आव्हान मिळालं. टीम इंडियाने हे आव्हान 3 विकेट्स गमावून पूर्ण केलं.

पाकिस्तान विरुद्ध या सामन्यात टीम इंडियाकडून सर्वाधिक 86 धावा केल्या. तर श्रेयस अय्यर याने नाबाद 53 धावा केल्या.

त्याआधी रोहित शर्माने टॉस जिंकून बाबरसेनेला बॅटिंगसाठी भाग पाडलं. पाकिस्तानकडून बाबर आझम याने 50 आणि मोहम्मद रिझवान याने 49 धावा केल्या.

टीम इंडियाकडून हार्दिक पंड्या, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, रवींद्र जडेजा आणि कुलदीप यादव या 5 जणांनी प्रत्येकी 2-2 विकेट्स घेतल्या.

टीम इंडियाने या विजयासह पॉइंट्स टेबलमध्ये अव्वलस्थानी झेप घेतली. टीम इंडियाने 6 पॉइंट्ससह आणि नेट रनरेटच्या जोरावर न्यूझीलंडला मागे टाकत पॉइंट्स टेबलमध्ये पहिलं स्थान पटकावलंय.