टीम इंडियाचा कसोटी क्रिकेटमध्ये विश्वविक्रम, वेस्ट इंडिजला पराभूत करताच नोंदवला रेकॉर्ड

भारताने वेस्ट इंडिजविरुद्धची मालिका 2-0 ने जिंकली. या मालिकेतील पहिला सामना एक डाव 140 धावांनी जिंकला होता. तर दुसरा कसोटी सामना 7 गडी राखून जिंकला. या मालिका विजयासह टीम इंडियाने एका विश्वविक्रमाला गवसणी घातली आहे.

Updated on: Oct 14, 2025 | 4:51 PM
1 / 5
टीम इंडियाने कसोटी क्रिकेटमध्ये एका मोठ्या विक्रमाला गवसणी घातली आहे. भारताने सलग मालिका जिंकण्याचा विक्रम प्रस्थापित केला आहे. म्हणजेच कसोटीत एकाच संघाविरुद्ध सर्वाधिक सलग मालिका जिंकण्याचा विक्रम रचला आहे. या यादीत भारताने पहिलं स्थान पटकावलं आहे. (Photo : BCCI Twitter)

2 / 5
भारताने वेस्ट इंडिजला सलग दहा कसोटी मालिकांमध्ये पराभवाची धूळ चारली आहे. भारताने 2002 पासून वेस्ट इंडिजविरुद्ध एकही कसोटी मालिका गमावलेली नाही. मग ती मायदेशी असो की त्यांच्या भूमीत.. सलग दहा मालिका जिंकत दक्षिण अफ्रिकेच्या विश्वविक्रमाची बरोबरी साधली आहे. (Photo : BCCI Twitter)

3 / 5
कसोटी क्रिकेटच्या इतिहासात एकाच संघाविरुद्ध सर्वाधिक कसोटी मालिका जिंकण्याचा विक्रम दक्षिण अफ्रिकेच्या नावावर होता. दक्षिण अफ्रिकेने 1998 ते 2024 या कालावधीत वेस्ट इंडिजविरुद्ध सलग दहा कसोटी मालिका जिंकल्या आहेत. (Photo: Proteas Men Twitter)

4 / 5
आता भारताने वेस्ट इंडिजविरुद्ध सलग दहावी मालिका जिंकली आहे. यासह भारताने दक्षिण अफ्रिकेच्या विश्वविक्रमाची बरोबरी साधली आहे. एकाच संघाविरुद्ध सलग 10 मालिका जिंकणारा भारत जगातील दुसरा संघ ठरला आहे. (Photo : BCCI Twitter)

5 / 5
वेस्ट इंडिजने भारतात 2013 पासून एकही कसोटी सामना जिंकलेला नाही. यावेळी वेस्ट इंडिज चमत्कार करेल अशी अपेक्षा होती. पण तसं काही झालं नाही. पहिल्या कसोटीत एक डाव आणि 140 धावांनी, तर दुसऱ्या सामन्यात 7 विकेट्सने पराभवाचं तोंड पाहावं लागलं. (Photo : BCCI Twitter)