
भारताने वेस्ट इंडिजविरुद्धची दोन सामन्यांची मालिका 2-0 ने खिशात घातली. या विजयासह भारताने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये मोठी कामगिरी केली आहे. भारताच्या विजयाची संख्या 922 पर्यंत वाढली आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक विजय मिळवणारा दुसरा संघ ठरला आहे. (Photo- BCCI Twitter)

भारताने दोन विजय मिळवण्यापूर्वी इंग्लंडचा संघ सर्वाधिक विजयाच्या यादीत दुसऱ्या स्थानावर होता. 1877 मध्ये क्रिकेटच्या आंतरराष्ट्रीय कारकीर्दीला सुरुवात झाली तेव्हा इंग्लंड 2117 सामने खेळला आहे. यात त्यांनी 921 सामन्यात विजय मिळवला आहे. तर 790 सामने गमावले आहेत. तर 11 सामने बरोबरीत सुटले आहेत. 219 सामने अनिर्णित राहीले. (Photo- BCCI Twitter)

शुबमन गिलच्या नेतृत्वात भारताची विजयी घोडदौड सुरु आहे. इंग्लंडला त्यांच्याच भूमीत 2-2 बरोबरीत रोखलं. त्यानंतर वेस्ट इंडिजला दोन्ही सामन्यात पराभवाची धूळ चारत आंतरराष्ट्रीय सर्वाधिक विजयाची नोंद केली आहे. भारतीय इंग्लंडच्या तुलनेत कमी सामने खेळला आहे, हे विशेष..(Photo- BCCI Twitter)

भारताने 1932 सालापासून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळण्यास सुरुवात केली. भारताने तेव्हापासून आतापर्यंत 1916 सामने खेळले आहेत. या काळात भारताने 922 सामन्यात विजय मिळवला आहे. तर 702 सामने गमावले आहेत. 18 सामने बरोबरीत सुटले. तर 50 सामने अनिर्णित ठरले. (Photo- BCCI Twitter)

ऑस्ट्रेलियाचा संघ विजयाच्या यादीत अव्वल स्थानी आहे. ऑस्ट्रेलिया 1877 पासून आंतरराष्ट्रीय सामने खेळत असून 2107 सामने खेळले आहेत. या काळात त्यांनी 1158 सामने जिंकले आहेत. तर 676 सामने गमावले आहेत. 14 सामने बरोबरीत, तर 219 सामने अनिर्णित ठरले आहेत. ऑस्ट्रेलिया एक हजाराहून अधिक सामने जिंकणारा जगातील एकमेव संघ आहे. (Photo- Cricket Australia Twitter)