1..2..3..4..5..! तिसऱ्या टी20 सामन्यात न्यूझीलंडला पराभूत करत भारताने नोंदवले इतके विक्रम

भारताने न्यूझीलंडला तिसऱ्या टी20 सामन्यात पराभूत केलं आणि मालिका जिंकली. या सामन्यात भारताने फक्त विजय नाही तर विक्रमही रचले. चला जाणून घेऊयात काय केलं ते...

| Updated on: Jan 25, 2026 | 10:52 PM
1 / 5
न्यूझीलंडने तिसऱ्या टी20 सामन्यात भारतासमोर विजयासाठी 154 धावांचं आव्हान ठेवलं होतं. हे आव्हान भारताने 10 षटकात पूर्ण केलं. पहिल्याच चेंडूवर संजू सॅमसनची विकेट पडली. त्यानंतर अभिषेक शर्मा, इशान किशन आणि सूर्यकुमार यादव यांनी सामना जिंकवला. इशान किशन 13 चेंडूत 28 धावा करून बाद झाला. तर अभिषेक शर्माने 20 चेंडूत नाबाद 68 आणि सूर्यकुमार यादवने 26 चेंडूत नाबाद 57 धावांची खेळी केली. (Photo- BCCI Twitter)

2 / 5
टीम इंडियाने 154 धावांचे लक्ष्य फक्त 10 षटकांत पूर्ण करून इतिहास रचला. भारताने 60 चेंडू शिल्लक ठेवून न्यूझीलंडचा पराभव केला. टीम इंडियाने घरच्या मैदानावर सर्वाधिक चेंडू शिल्लक ठेवून केलेला सर्वात मोठा टी20 विजय आहे. यापूर्वी बांगलादेशला 49 चेंडू शिल्लक ठेवून पराभूत केलं होतं. (Photo- BCCI Twitter)

3 / 5
भारताने घरच्या मैदानावर सलग 10 टी20 मालिका जिंकण्याचा विक्रम केला आहे. 2022 ते 2026 या कालावधीत भारताने 10 मालिका जिंकल्या आहेत. तर ऑस्ट्रेलियाने 2006 ते 2010 कालावधीत 8, भारताने 2019 ते 2022 या कालावधीत 7 आणि पाकिस्तानने 2008 ते 2018 या कालावधीत 6 टी20 मालिका जिंकल्या आहेत. (Photo- BCCI Twitter)

4 / 5
भारताने सलग टी20 मालिका जिंकण्याचा विक्रम रचला आहे. या विक्रमात सध्या पाकिस्तानशी बरोबरी केली आहे. भारताने 2024 पासून आतापर्यंत सलग 11 टी20 मालिका जिंकल्या आहेत. पाकिस्तानने 2016 ते 2018 कालावधीत 11 मालिका जिंकल्या होत्या. तर भारताने 2017 ते 2018 या कालावधीत 7 मालिका, 2019-2021 या कालावधीत 6 मालिका जिंकल्या आहेत. (Photo- BCCI Twitter)

5 / 5
कोणत्याही लक्ष्याचा पाठलाग करताना न्यूझीलंडविरुद्ध सर्वात मोठा विजय आहे. कोणत्याही संघाने त्यांच्याविरुद्ध 10 षटकांच्या आत लक्ष्य गाठलेले नाही. त्यामुळे भारताच्या शिरपेचात आणखी मानाचा तुरा खोवला गेला आहे. (Photo- BCCI Twitter)