Team India : टीम इंडियाचा सामना अवघ्या 60 रुपयांत पाहता येणार, क्रिकेट बोर्डाची घोषणा

Indian Cricket Team : क्रिकेट चाहत्यांचं स्टेडियममध्ये जाऊन सामना पाहण्याचं स्वप्न असतं. मात्र कधी पैशांमुळे तर कधी तिकीट उपलब्ध नसल्याने स्टेडियममध्ये जाऊन सामना पाहण्याचं स्वप्न स्वप्नच राहतं. मात्र हे स्वप्न आता पूर्ण होणार आहे. क्रिकेट चाहत्यांना टीम इंडियाचा सामना हा अवघ्या 60 रुपयांत पाहता येणार आहे. जाणून घ्या.

| Updated on: Oct 20, 2025 | 1:59 PM
1 / 5
टीम इंडिया ऑस्ट्रेलिया दौऱ्यानंतर मायदेशात दक्षिण आफ्रिकेविरुद्ध भिडणार आहे. टीम इंडिया घरात दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 2 सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे.  सलामीचा सामना हा 14 नोव्हेंबरपासून कोलकातामधील ईडन गार्डन्समध्ये होणार आहे. या सामन्याच्या तिकीट विक्रीला दिवाळीपासून सुरुवात होणार आहे. या सामन्याच्या तिकाटाचे किमान दर हे 60 रुपये आहे. बंगाल क्रिकेट असोसिएशनने याबाबतची माबिती दिली आहे. (Photo Credit : PTI)

2 / 5
चाहते डिस्ट्रीक्ट बाय झोमॅटो एपद्वारे या सामन्याचं तिकीट खरेदी करु शकतात. या सामन्याच्या एका दिवसाच्या तिकीटाची रक्कम 60 रुपये इतकी असेल, अशी माहिती क्रिकेट असोसिएशन ऑफ बंगालकडून देण्यात आली. (Photo Credit : PTI)

3 / 5
टीम इंडिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यातील दुसरा कसोटी सामना हा 22 नोव्हेंबरपासून गुवाहाटीत होणार आहे. त्यानंतर उभयसंघात 3 एकदिवसीय आणि 5 टी 20i सामन्यांच्या मालिकेचा थरार रंगणार आहे. (Photo Credit : PTI)

4 / 5
दक्षिण आफ्रिकेने अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाला पराभूत करत आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप 2023-2025 या साखळीच जेतेपद पटकावलं होतं. तसेच टीम इंडियाने नुकतंच विंडीजला मायदेशात 2-0 ने पराभूत केलं होतं. (Photo Credit : PTI)

5 / 5
टीम इंडिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यातील एकदिवसीय मालिकेला 30 नोव्हेंबरपासून सुरुवात होणार आहे. तर 9 डिसेंबरपासून 5 सामन्यांच्या टी 20i मालिकेचा थरार रंगणार आहे. (Photo Credit : PTI)