
शुबमन गिलचा 8 सप्टेंबरला जन्मदिवस असतो. शुबमन गिल आज 24 वर्षांचा झाला असून 25 व्या वर्षात पदार्पण केलं आहे. गिल सध्या आशिया चषक खेळत असून कोलंबोमध्ये वाढदिवस साजरा केला. क्रिकेटमध्ये जबरदस्त कामगिरी करत गिलने काही विक्रमांची नोंद केली आहे.

आयपीएलमध्ये प्रभावी कामगिरी केल्यानंतर गिलने 31 जानेवारी 2019 रोजी न्यूझीलंड विरुद्ध वनडे क्रिकेटमध्ये पदार्पण केलं. 2020 मध्ये कसोटी आणि टी20मध्ये पदार्पण केलं. या कालावधीत त्याने आपल्या खेळीने क्रीडारसिकांची मनं जिंकली आहेत.

2023 या वर्षाच्या सुरुवातीला शुबमन गिलने न्यूझीलंडविरुद्धच्या वनडे सामन्यात द्विशतक झळकावले. अशी कामगिरी करणारा तो सर्वात तरुण खेळाडू ठरला. त्याने 23 वर्षे 132 दिवसांचा असताना ही कामगिरी केली. इशान किशनने 24 वर्षे 154 दिवसांचा असताना द्विशतक झळकावले आहे.

न्यूझीलंडविरुद्ध टी20 सामन्यात शतक झळकावल्यानंतर शुबमन गिल क्रिकेटच्या तिन्ही प्रकारामध्ये शतक करणारा तरुण खेळाडू ठरला आहे.

आशिया कप स्पर्धेत नेपाळ विरुद्ध 62 चेंडूत 67 धावा केल्या आणि एकदिवसीय सामन्यात 1500 धावा करणारा तरूण खेळाडू ठरला आहे. तसेच आयपीएल 2023 मध्ये 16 सामन्यांमध्ये 851 धावा करून 700 धावांचा टप्पा गाठणारा तरूण खेळाडू ठरला आहे.

शुबमन गिलने आयपीएल इतिहासात ऑरेंज कॅप जिंकणारा सर्वात तरुण खेळाडू ठरला आहे. आयपीएल 2023 मध्ये 851 धावांसह त्याने वयाच्या 23 व्या वर्षी हा विक्रम केला. 2021 मध्ये हा ऑरेंज कॅपचा मान ऋतुराज गायकवाड याला मिळाला होता आणि तरूण खेळाडू ठरला होता.