ऑस्ट्रेलियाविरुद्धचा पहिला वनडे सामना भारताने गमावला, पण स्मृती मंधानाने रचला विक्रम; वाचा काय ते

टी20 मालिका संपल्यानंतर भारतील महिला संघ वनडे मालिकेला सामोरं जात आहे. पण पहिल्याच वनडे सामन्यात भारताला ऑस्ट्रेलियाने 6 गडी राखून मात दिली. भारताचा पहिल्याच सामन्यात पराभव झाला असला तरी स्मृती मंधानाने विक्रम रचला आहे.

| Updated on: Feb 24, 2026 | 5:06 PM
1 / 5
भारत आणि ऑस्ट्रेलिया महिला संघांमध्ये तीन सामन्यांची वनडे मालिका सुरू आहे. या मालिकेतील पहिल्याच सामन्यात ऑस्ट्रेलियाने 6 गडी राखून भारतीय संघाला मात दिली. तसेच या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. असं असताना स्मृती मंधानाने या सामन्यात अर्धशतकी खेळीसह विक्रम रचला आहे. (Photo- BCCI Women Twitter)

2 / 5
ब्रिस्बेनमध्ये पार पडलेल्या सामन्यात नाणेफेक जिंकून भारताने प्रथम फलंदाजी निवडली.  स्मृती मंधानाने चांगली सुरुवात करून दिली. तिने फक्त 57 चेंडूत अर्धशतक पूर्ण केले. या अर्धशतकासह  ऑस्ट्रेलियाविरुद्ध सर्वाधिक 50हून अधिक धावा करणारी आशियाई फलंदाज ठरली आहे. (Photo- BCCI Women Twitter)

3 / 5
स्मृती मंधानाने आतापर्यंत ऑस्ट्रेलियाविरुद्ध 22 एकदिवसीय सामने खेळले आहेत. या दरम्यान तिने 4 शतके आणि 7 अर्धशतके झळकावली आहेत. यासह, ती ऑस्ट्रेलियाविरुद्ध सर्वाधिक 50+ धावा करणारी आशियाई फलंदाज बनली आहे. (Photo- BCCI Women Twitter)

4 / 5
स्मृती मंधाना ऑस्ट्रेलियाविरुद्ध एकदिवसीय सामन्यात 1000 धावा करणारी दुसरी भारतीय फलंदाज आहे. मिताली राजनंतर तिने ही कामगिरी केली आहे. स्मृतीने आतापर्यंत ऑस्ट्रेलियाविरुद्ध 1078 धावा केल्या आहेत. (Photo- BCCI Women Twitter)

5 / 5
स्मृती मंधानाने या सामन्यात 68 चेंडूंचा सामना केला आणि 58 धावा केल्या. यात तिने 7 चौकार मारले. यावेळी तिचा स्ट्राईक रेट हा 85.29 चा होता. (Photo- BCCI Women Twitter)