IPL 2021 : चेन्नई की दिल्ली, फायनलमध्ये पहिल्यांदा कोण एन्ट्री करणार? या 5 खेळाडूंच्या हातात सामन्याचा निकाल!
चेन्नई सुपर किंग्ज आणि दिल्ली कॅपिटल्सचे संघ रविवारी पहिल्या क्वालिफायरमध्ये आमनेसामने येतील. विजेत्या संघाला अंतिम फेरीचे तिकीट मिळेल. दोन्ही संघ अंतिम फेरीत जाण्याचा पुरेपूर प्रयत्न करतील. मात्र, विजयाची माळ कुणाच्या गळ्यात पडेल ते 5 खेळाडूंच्या कामगिरीवरून ठरेल. असे कोण आहेत ते 5 खेळाडू ज्यांच्यामुळे सामन्याचा निकाल पालटू शकतो, आपण पाहुयात...

चेन्नई सुपर किंग्ज आणि दिल्ली कॅपिटल्सचे संघ रविवारी पहिल्या क्वालिफायरमध्ये आमनेसामने येतील. विजेत्या संघाला अंतिम फेरीचे तिकीट मिळेल. दोन्ही संघ अंतिम फेरीत जाण्याचा पुरेपूर प्रयत्न करतील. मात्र, विजयाची माळ कुणाच्या गळ्यात पडेल ते 5 खेळाडूंच्या कामगिरीवरून ठरेल. असे कोण आहेत ते 5 खेळाडू ज्यांच्यामुळे सामन्याचा निकाल पालटू शकतो, आपण पाहुयात...
- सीएसके संघाचा कर्णधार महेंद्रसिंग धोनी प्लेऑफमध्ये सर्वात अनुभवी कर्णधार आहे. त्याने 11 प्लेऑफ आणि 8 अंतिम सामने खेळले आहेत. धोनी हा असा खेळाडू आहे की ज्याच्याकडे कर्णधारपदाबरोबरच संपूर्ण सामन्याचा निकाल बदलण्याची क्षमता आहे. अशा स्थितीत तो आपला संघ जिंकावा म्हणून आटोकाट प्रयत्न करेल. तसंच पुढच्या वर्षी तो आयपीएल खेळणार नसल्याच्या देखील चर्चा झडत आहेत. त्यामुळे यंदाच्या साली फॉर्मात असणाऱ्या सीएसकेला अंतिम फेरी जिंकवून देण्याचा धोनी पुरेपूर प्रयत्न करेल.
- चेन्नई सुपर किंग्ज आणि दिल्ली कॅपिटल्सचे संघ रविवारी पहिल्या क्वालिफायरमध्ये आमनेसामने येतील. विजेत्या संघाला अंतिम फेरीचे तिकीट मिळेल. दोन्ही संघ अंतिम फेरीत जाण्याचा पुरेपूर प्रयत्न करतील. मात्र, विजयाची माळ कुणाच्या गळ्यात पडेल ते 5 खेळाडूंच्या कामगिरीवरून ठरेल. असे कोण आहेत ते 5 खेळाडू ज्यांच्यामुळे सामन्याचा निकाल पालटू शकतो, आपण पाहुयात…
- दिल्ली कॅपिटल्सचा सलामीवीर शिखर धवन हा यंदाच्या मोसमात दिल्लीसाठी सर्वाधिक धावा करणारा खेळाडू आहे. त्याने गेल्या 14 सामन्यांमध्ये 544 धावा केल्या आहेत. संघाला दमदार सुरुवात देण्याची जबाबदारी धवनवर असेल. त्याचा साथीदार पृथ्वी शॉ विशेष फॉर्ममध्ये नाही, त्यामुळे संघाला सर्वात फॉर्ममध्ये असलेल्या फलंदाजाकडून मोठ्या अपेक्षा असतील.
- चेन्नई सुपर किंग्ज संघाचा स्टार अष्टपैलू रवींद्र जडेजा यंदाच्या मोसमात चांगला लयीत आहे. तो बॅट आणि बॉलने चांगला खेळ करतोय. जडेजा फिनिशरची भूमिका उत्तमरित्या बजावतो तसंच गोलंदाज म्हणूनही सामना फिरवण्याची ताकद त्याच्यात आहे. अशा परिस्थितीत चेन्नईला जिंकण्यासाठी जडेजाचा फॉर्म अबाधित राहणं महत्त्वाचे आहे.
- क्वालिफायरमध्ये दिल्ली कॅपिटल्सचा वेगवान गोलंदाज एनरिक नोर्खियाची भूमिकाही खूप महत्त्वाची असणार आहे. पहिल्या टप्प्यात नोरखिया खेळला नाही, तरीही दुसऱ्या टप्प्यात तो 6 सामन्यांत 9 विकेट घेत संघाचा एक महत्त्वाचा गोलंदाज म्हणून पुढे आला आहे. त्याच्या बोलिंग स्पीडबरोबरच तो महत्त्वाच्या वेळी विकेट घेण्याचंही काम करतो.
- चेन्नई सुपर किंग्जसाठी महाराष्ट्राच्या ऋतुराज गायकवाडने दमदार कामगिरी केली आहे. त्याने फाफ डु प्लेसिस संगतीने संघासाठी अनेक महत्त्वपूर्ण खेळी खेळल्या आहेत. ऋतुराजने लीगमध्ये आतापर्यंत 20 षटकार आणि 56 चौकार मारले आहेत. यंदाच्या मोसमात त्याने दमदार शतकही झळकावलंय. आता प्लेऑफमध्ये त्याच्या अशाच बॅटिंगची संघाला गरज आहे.






