
आयपीएलमध्ये सर्वाधिक षटकार ठोकणाऱ्या फलंदाजांच्या यादीत मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्मा आता दुसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे. (Photo : IPL/BCCI)

रोहित शर्माने एबी डिव्हिलियर्सला मागे टाकलं आहे. एबी डिव्हिलियर्स आरसीबीकडून खेळत होता. (Photo : IPL/BCCI)

वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीच्या खेळीच्या तिसऱ्या षटकातील शेवटच्या चेंडूवर रोहितने षटकार ठोकला. यासह रोहितच्या नावावर या लीगमध्ये 252 षटकार झाले आहेत. एबी डिव्हिलियर्सच्या नावावर 251 षटकार आहेत. (Photo : IPL/BCCI)

सीएसकेचा कर्णधार आणि यष्टीरक्षक फलंदाज महेंद्रसिंग धोनी 239 षटकारांसह यादीत चौथ्या क्रमांकावर आहे. तर आयपीएलमध्ये 357 षटकार खेचणारा ख्रिस गेल अव्वल स्थानावर आहे. (Photo : IPL/BCCI)

रोहित शर्माने गुजरात विरुद्धच्या सामन्यात 18 चेंडूचा सामना केला. या तत्याने 3 चौकार आणि 2 षटकारांच्या मदतीने 29 धावा केल्या. मात्र राशिद खानच्या गोलंदाजीवर बाद होत तंबूत परतला. (Photo : IPL/BCCI)

मुंबई इंडियन्सने गुजरातसमोर विजयासाठी 219 धावांचं आव्हान ठेवलं आहे. हा विजय मुंबईसाठी महत्त्वाचा आहे. गुजरातने हा सामना जिंकल्यास थेट प्लेऑफचं तिकीट मिळणार आहे. (Photo : IPL/BCCI)