
आयपीएल 2023 स्पर्धेतील साखळी फेरीचे शेवटचे चार सामने शिल्लक आहेत. या सामन्यानंतर प्लेऑफचं चित्र स्पष्ट होणार आहे. प्लेऑफच्या तीन जागांसाठी पाच संघ सज्ज आहेत.

आतापर्यंत एकूण 66 सामने पूर्ण झाले असले तरी केवळ गुजरात टायटन्सनेच प्लेऑफमध्ये प्रवेश केला आहे. उर्वरित 3 जागांसाठी 5 संघांमध्ये स्पर्धा आहे. मात्र या स्पर्धेत इतर संघांचा निकाल खूप महत्त्वाचा ठरला आहे.

चेन्नई सुपर किंग्स आणि लखनऊ सुपर जायंट्सने पुढचे सामने जिंकले तर ते प्लेऑफमध्ये प्रवेश करतील. त्याचप्रमाणे, जर मुंबई इंडियन्स आणि आरसीबी संघांनी पुढील सामना जिंकला तर सर्वाधिक नेट रनरेट असलेला संघ टॉप-4 मध्ये स्थान मिळवेल.

सनरायझर्स हैदराबादने मुंबई इंडियन्सविरुद्ध विजय मिळवला आणि गुजरात टायटन्सने आरसीबीचा पराभव केला तर राजस्थान रॉयल्सला प्लेऑफमध्ये प्रवेश करण्याची संधी मिळेल.

मुंबई इंडियन्स आणि आरसीबी संघांमधील पुढील सामन्यांचा निकाल सध्या पॉइंट टेबलमध्ये पाचव्या स्थानावर असलेल्या राजस्थान रॉयल्ससाठी खूप महत्त्वाचा आहे.

सनरायझर्स हैदराबादने मुंबई इंडियन्सला पराभूत केलं, तर राजस्थान रॉयल्सचं संपूर्ण लक्ष आरसीबी आणि गुजरात टायटन्स या सामन्याकडे असेल.

मुंबईने पुढचा सामना गमावला, तर राजस्थान रॉयल्ससाठी गुजरात टायटन्सने जिंकणे आवश्यक आहे. गुजरात टायटन्सने आरसीबीविरुद्ध 6 धावांनी किंवा 4 चेंडू राखून विजय मिळवल्यास राजस्थान रॉयल्स गुणतालिकेत चौथ्या स्थानावर जाईल.

राजस्थान रॉयल्ससाठी मुंबई इंडियन्स आणि आरसीबीचा पराभव महत्त्वाचा आहे. वरील गणित जुळून आलं तर राजस्थान रॉयल्स प्लेऑफमध्ये आश्चर्यकारकपणे प्रवेश करेल.