Rohit Sharma | रोहित शर्मा याचं अखेर नको त्या यादीत नाव, हिटमॅनला आयुष्यभर खंत राहील

| Updated on: May 04, 2023 | 4:17 PM

रोहित शर्मा याने आयपीएल इतिहासात आतापर्यंत मुंबई इंडियन्सला एकूण 5 वेळा आपल्या नेतृत्वात चॅम्पियन केलंय. मात्र रोहितचं नावावर मोठा डाग लागला आहे. जाणून घ्या.

1 / 5
आयपीएल 16 व्या मोसमात बुधवारी 3 मे रोजी पंजाब किंग्स विरुद्धच्या सामन्यात मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्मा अपयशी ठरला. रोहित भोपळा फोडण्यात अपयशी ठरला. रोहित 3 बॉल खेळून माघारी परतला.  यासोबत रोहितच्या नावावर कधीही न पुसला जाणार डाग लागला. रोहितने आयपीएलमध्ये सर्वाधिक वेळा झिरोवर आऊट होण्याच्या विक्रमाची बरोबरी केली आहे.

2 / 5
मुंबईकडून रोहित शर्मा इशान किशनसोबत 215 धावांच्या आव्हानसाठी मैदानात उतरला. मात्र पंजाबच्या ऋषी धवन याने रोहितला पहिल्याच ओव्हरमध्ये आऊट केलं. रोहितने यासह आयपीएलमध्ये सर्वाधिक वेळा झिरोवर आऊट होणाऱ्या फलंदाजांच्या यादीत एन्ट्री केली. रोहितची झिरोवर आऊट होण्याची ही 15 वी वेळ ठरली.

3 / 5
तसेच रोहितची आयपीएल 16 व्या सिजनमध्ये झिरोवर बाद होण्याची तिसरी वेळ ठरली. रोहित व्यतिरिक्त आरसीबीचा विकेटकीपर बॅट्समन दिनेश कार्तिक हा देखील 15 वेळा झिरोवर आऊट झालाय. तर सुरु मोसमात एकदा खातं न खोलता माघारी परतला आहे.

4 / 5
रोहित, दिनेशनंतर केकेआरचा सुनील नरेन हा देखील या गटाचा भाग आहे. सुनीर हा देखील एकूण 15 वेळा भोपळा फोडण्यात अपयशी ठरलाय. लाजिरवाणी बाब अशी की सुनीलही रोहितप्रमाणे या सिजनमध्ये एकूण 3 वेळा झिरोवर आऊट झालाय.

5 / 5
रोहित, दिनेश आणि सुनील या तिघांव्यतिरिक्त चौथा फलंदाज आहे तो केकेआरचा मनदीप सिंह. मनदीपदेखील  15 वेळा डक झालाय. मनदीप या 16 व्या सिजनमध्ये एकदाच झिरोवर आऊट झालाय.