
आयपीएलमधील डावाच्या पहिल्या षटकात 2 वेळा 20 हून अधिक धावा करणारा यशस्वी जयस्वाल पहिला फलंदाज ठरला आहे. जयस्वालने गुरुवारी केकेआरचा कर्णधार नितीश राणाच्या पहिल्या षटकात 26 धावा केल्या. यापूर्वी याच स्पर्धेत दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध 20 धावा केल्या होत्या. (Photo: BCCI/IPL)

राजस्थान रॉयल्सचा सलामीवीर यशस्वी जयस्वालने गुरुवारी कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध 13 चेंडूत आयपीएल T20 लीगच्या इतिहासातील सर्वात जलद अर्धशतक झळकावले.(Photo: BCCI/IPL)

युवराज सिंगने 2007 टी-20 विश्वचषकात इंग्लंडविरुद्ध फक्त 12 चेंडूत सर्वात वेगवान टी-20 आंतरराष्ट्रीय अर्धशतक ठोकले. स्टुअर्ट ब्रॉडच्या एका षटकात सहा षटकार मारले होते. (Source: Twitter)

ख्रिस गेलने बिग बॅश लीग 2016 मध्ये एडलेड स्ट्रायकर्स विरुद्ध मेलबर्न रेनेगेड्ससाठी विक्रमी 12 चेंडूत अर्धशतक ठोकले होते.(Source: Twitter)

सुनील नरेनने बांगलादेश प्रीमियर लीग 2022 मध्ये चट्टोग्राम चॅलेंजर्सविरुद्ध कोमिल्ला व्हिक्टोरियन्ससाठी 13 चेंडूत अर्धशतक ठोकले. (Source: Twitter)

अफगाणिस्तानचा फलंदाज हजरतुल्ला झाझाईने 2018 मध्ये बल्ख लिजेंड्स विरुद्ध काबुल झ्वानानकडून खेळताना अफगाणिस्तान प्रीमियर लीगमध्ये 12 चेंडूत अर्धशतक झळकावले होते. (Source: Twitter)