

राजस्थान रॉयल्स टीमच्या यशस्वी जयस्वाल याने कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध 11 मे रोजी 98 धावांची नाबाद खेळी करत राजस्थानला जिंकवलं. यशस्वीने या हंगामात आतापर्यंत 12 सामन्यांमध्ये 1 शतक आणि 4 अर्धशतकांसह 575 धावा केल्या आहेत.

रिंकू सिंह याने केकेआर टीमला गुजरात टायटन्स विरुद्ध अशक्य असा विजय मिळवून दिला. रिंकूने 5 बॉलमध्ये 5 सिक्स ठोकून सनसनाटी विजय मिळवून दिला. रिंकून गुजरातच्या हातातोंडाशी आलेला विजयाचा घास हिसकावून घेतला.

तिळक वर्मा याने या मोसमात मुंबई इंडियन्सकडून 9 सामन्यात 274 धावा केल्या आहेत. नाबाद 84 हा तिळकचा त्याचा हायस्कोअर आहे.

केकेआर टीमच्या सुयश शर्मा याने 8 सामन्यांमध्ये 10 विकेट्स घेतल्या आहेत. सुयशला अजून आपली छाप सोडता आली नसली तरी त्याने लक्ष वेधून नक्कीच घेतलंय.

सनरायजर्स हैदराबाद टीमच्या मयंक मार्कंडे याने 8 सामन्यात 11 विकेट्स घेतल्या आहेत. मयंकने आपल्या लेग स्पिनच्या मदतीने दिग्गजांना प्रभावित केलं आहे. त्यामुळे आगामी काळात निवड समिती या 5 जणांपैकी कुणाला संधी देतं, याकडे चाहत्यांचं लक्ष असेल.