
आयपीएलचं 17 व्या पर्वाचा रंग आता हळूहळू चढू लागला आहे. जयपराजयाचं गणित प्रत्येक दिवसाला समोर येणार आहे. पहिल्याच सामन्यात चेन्नई सुपर किंग्सने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पराभव केला. 6 गडी राखून पराभवाचं पाणी पाजलं. विजयी सुरुवात करूनही ख्रिस गेलने भलत्याच चार संघांना विजयासाठी पसंती दिली आहे.

ख्रिस गेलच्या मते, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु हा संघ प्लेऑफमध्ये स्थान मिळवेल. या संघाची फलंदाजीची बाजू भक्कम आहे. त्यामुळे प्लेऑफमध्ये स्थान मिळवण्याची शक्यता सर्वाधिक आहे.

हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखालील मुंबई इंडियन्स संघाला दुसरी पसंती दिली आहे. गेलच्या मते, प्लेऑपच्या चार संघात मुंबई इंडियन्सचा संघ असणार आहे.

राजस्थान रॉयल्स संघाचं नाव घेऊन ख्रिस गेलने सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला आहे. संजू सॅमसनच्या नेतृत्वात हा संघ मागच्या पर्वापासून चांगली कामगिरी करत आहे. त्यामुळे राजस्थान रॉयल्सकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा आहे.

कोलकाता नाइट रायडर्स हा प्लेऑफमधील चौथा संघ असणार आहे. श्रेयस अय्यरने या संघाची धुरा हाती घेतली आहे. तसेच मेंटॉर म्हणून गौतम गंभीर आहे. त्यात रिंकू सिंह आणि आंद्रे रसेल फॉर्मात आहेत. त्यामुळे केकेआरला पसंती दिली आहे.

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू, मुंबई इंडियन्स, राजस्थान रॉयल्स आणि कोलकाता नाईट रायडर्स प्लेऑफमध्ये खेळतील. पण गुजरात टायटन्स, चेन्नई सुपर किंग्स, दिल्ली कॅपिटल्स, सनरायझर्स हैदराबाद, लखनौ सुपर जायंट्स आणि पंजाब किंग्स या संघांना आता अधिक मेहनत घेणं गरजेचं आहे.