
आयपीएलच्या 17 व्या हंगामातील तिसरा सामना हा कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध सनरायजर्स हैदराबाद विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स, यांच्यात होणार आहे. दोन्ही संघांचा हा या सिजनमधील पहिलाच सामना आहे. या सामन्यात केकेआरचे त्रिकुट फटकेबाजी करण्यासाठी सज्ज आहेत.

रिंकू सिंह याने गेल्या हंगामात विस्फोटक कामगिरी केली. रिंकू फिनिशिर म्हणून उदयास आला. रिंकू हैदराबाद विरुद्ध धमाका करण्यासाठी तयार आहे.

रिंकूने 16 व्या मोसमाील 14 सामन्यांमध्ये 31 चौकार आणि 29 सिक्स ठोकले. रिंकूने त्या हंगामात 67 धावांची सर्वोच्च खेळी केली होती. रिंकूने आयपीएल कारकीर्दीतील 31 सामन्यांमध्ये 725 धावा केल्या आहेत.

आंद्रे रसेल हा केकेआरच्या गोटातील दुसरा तोडू आणि आक्रमक फलंदाज आहे. आंद्रे रसेलची बॅट चालली तर तो कोणताही सामना एकहाती जिंकून देतो. रसेलने आयपीएलमध्ये अनेकदा अशी कामगिरी केली आहे.

केकेआरचा तिसरा आणि अखेरचा विस्फोटक फलंदाज म्हणजे गुरुबाज. अफगाणिस्तानच्या या खेळाडूने 16 व्या हंगामातून आयपीएल पदार्पण केलं. रहमानुल्लाह गुरुबाज याने आयपीएलच्या 11 सामन्यांमध्ये 227 धावा केल्या आहेत.