IPL 2024, RCB vs SRH : ट्रेव्हिस हेडची बंगळुरुविरुद्ध सेंच्युरी, नोंदवलं स्पर्धेतील सर्वात जलद शतक

| Updated on: Apr 15, 2024 | 8:43 PM

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात सामना सुरु आहे. या सामन्यात ट्रेव्हिस हेडचा झंझावात पाहायला मिळाला. ट्रेव्हिस हेडने बंगळुरुच्या गोलंदाजांना सळो की पळो करून सोडलं. त्यामुळे 250 धावांचा पल्ला गाठणार असा अंदाज आहे.

1 / 5
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु विरुद्ध ट्रेव्हिस हेडची बॅट चांगलीच तळपली. गोलंदाज गोलंदाजी करताना पुरते हतबल असल्याचं दिसून आले. कुठे चेंडू टाकायचा हेच कळेनासं झालं होतं. चौकार आणि षटकारांचा अक्षरश: वर्षाव केला.

2 / 5
ट्रेव्हिस हेडने 41 चेंडूत 102 धावा केल्या. यात 9 चौकार आणि 8 षटकार मारले. पण लॉकी फर्ग्युसनच्या गोलंदाजीवर उत्तुंग फटका मारताना ट्रेव्हिस हेड बाद झाला. फाफ डु प्लेसिसने त्याचा झेल पकडला. पण तिथपर्यंत त्याने आपलं काम बजावलं होतं.

3 / 5
ट्रेव्हिस हेडने या पर्वातील सर्वात वेगवान शतक ठोकलं. 39 चेंडूत त्याने आपलं शतक ठोकलं. सर्वात वेगवान शतकाचा विक्रम ख्रिस गेलच्या नावावर आहे. त्याने 30 चेंडूत शतक ठोकलं होतं. त्यानंतर युसूफ पठाणने 37 चेंडूत, डेविड मिलरने 38 चेंडूत शतक ठोकलं आहे.

4 / 5
आयपीएल 2024 स्पर्धेतील हे तिसरं शतक आहे. विराट कोहली, रोहित शर्मा यांच्यानंतर ट्रेव्हिस हेडने शतक ठोकलं आहे. पण त्यांच्या तुलनेत हे शतक वेगवान होतं.

5 / 5
ट्रेव्हिस हेडने आतापर्यंत 14 आयपीएल सामने खेळला आहे. त्यात त्याने 40 च्या सरासरीने जवळपास 400 हून अधिक धावा केल्या आहेत. यात एक शतक आणि 2 अर्धशतकांचा समावेश आहे. (सर्व फोटो- SRH Twitter)