
आयपीएल 2025 स्पर्धा एका आठवड्यासाठी पुढे ढकलण्यात आल्याची माहिती आहे. पण या स्पर्धेबाबत सर्व काही भारत पाकिस्तान युद्धजन्य स्थितीवर अवलंबून आहे. जर ही स्पर्धा सुरु झाली तर 59व्या सामन्यापासून या स्पर्धेला सुरुवात होईल.

या स्पर्धेतील 58 सामने आधीच खेळले गेले आहेत. फक्त 16 सामने शिल्लक आहेत. या 16 सामन्यांपैकी फक्त 12 लीग सामने शिल्लक आहेत. 12 सामन्यांवरून यावर्षीच्या आयपीएलमध्ये प्लेऑफमध्ये खेळणारे चार संघ निश्चित होतील. प्लेऑफच्या शर्यतीत सध्या सात संघ आहेत. चला जाणून घेऊयात त्यांचं प्लेऑफचं गणित

गुजरात टायटन्स: शुबमन गिलच्या नेतृत्वाखालील गुजरात टायटन्सने 11 पैकी 8 सामने जिंकले आहेत. 18 गुण मिळवण्यासाठी आणि पुढील टप्प्यात जाण्यासाठी गुजरात टायटन्सला उर्वरित तीन सामन्यांपैकी एक सामना जिंकणे आवश्यक आहे. (Photo : IPL/BCCI)

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू: रजत पाटीदारच्या नेतृत्वाखालील आरसीबी संघाने 11 पैकी 8 सामने जिंकले आहेत. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला अजून तीन सामने खेळायचे आहेत आणि यापैकी एक सामना जिंकला तर ते 18 गुणांसह प्लेऑफसाठी पात्र ठरतील. (Photo : IPL/BCCI)

पंजाब किंग्स: श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखालील पंजाब किंग्जने 11 पैकी 7 सामने जिंकले आहेत. आता उर्वरित तीन पैकी 2 सामने जिंकले तर ते 19 गुणांसह प्लेऑफमध्ये प्रवेश करतील. (Photo : IPL/BCCI)

मुंबई इंडियन्स: हार्दिक पंड्याच्या नेतृत्वाखालील मुंबई इंडियन्स संघाने आतापर्यंत 12 सामने खेळले आहेत आणि त्यापैकी सात सामने जिंकले आहेत. जर उर्वरित दोन पैकी 2 सामने जिंकले तर 18 गुणांसह प्लेऑफमध्ये प्रवेश करू शकतात. (Photo : IPL/BCCI)

दिल्ली कॅपिटल्स: अक्षर पटेलच्या नेतृत्वाखालील दिल्ली कॅपिटल्स संघाने 11 सामने खेळले आहेत आणि त्यापैकी 6 सामने जिंकले आहेत. त दिल्ली कॅपिटल्सने त्यांचे पुढील तीन पैकी ३ सामने जिंकले तर त्यांना 19 गुणांसह प्लेऑफमध्ये प्रवेश निश्चित होईल. (Photo : IPL/BCCI)

लखनौ सुपरजायंट्स: ऋषभ पंतच्या नेतृत्वाखालील लखनौ सुपरजायंट्स संघाने खेळलेल्या 11 पैकी पाच सामन्यांमध्ये विजय मिळवला आहे. जर त्यांनी उर्वरित तीन पैकी ३ सामने जिंकले तर 16 गुणांसह प्लेऑफमध्ये स्थान मिळू शकते. (Photo : IPL/BCCI)

कोलकाता नाईट रायडर्स: अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाखालील केकेआरने आतापर्यंत खेळलेल्या 12 पैकी 5 सामन्यांमध्ये विजय मिळवला आहे. जर त्यांनी उर्वरित दोन सामने जिंकले तर15 गुणांसह अव्वल चारमध्ये स्थान मिळवू शकतात. परंतु पॉइंट टेबलमध्ये चौथ्या क्रमांकावर असलेल्या संघाला 15 गुण मिळाले तरच केकेआरला नेट रन रेटच्या आधारे प्लेऑफमध्ये पात्र होण्याची संधी मिळेल. (Photo : IPL/BCCI)

सनरायझर्स हैदराबाद, राजस्थान रॉयलस आणि चेन्नई सुपर किंग्स यांचं स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आलं आहे. त्यामुळे उर्वरित सामन्यात विजय मिळवला तरी काही फरक पडणार नाही. पण हे संघ वर असलेल्या सात संघांचं प्लेऑफचं गणित बिघडवू शकतात. उर्वरित 16 पैकी चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध राजस्थान रॉयल् हा सामना फक्त औपचारिक असेल. (Photo : IPL/BCCI)