IPL 2025 : टीम इंडियात स्थान मिळवण्यासाठी पाच अनकॅप्ड खेळाडू सज्ज, का आणि कसं ते जाणून घ्या

आयपीएल 2025 स्पर्धेला आता रंग चढू लागला आहे. आतापर्यंत झालेल्या सामन्यात पाच अनकॅप्ड खेळाडूंनी लक्ष वेधून घेतलं आहे. आयपीएलनंतर भारतीय संघ इंग्लंड दौऱ्यावर पाच सामन्यांची टी20 मालिका खेळणार आह. तर सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वात टी20 वर्ल्डकप 2026 कडे लक्ष असेल. यामुळे पाच अनकॅप्ड खेळाडूंची चर्चा रंगली आहे.

| Updated on: Apr 09, 2025 | 6:54 PM
1 / 6
आयपीएल 2025 स्पर्धा आता रंगतदार वळणार आली आहे. आतापर्यंत 22 सामने पूर्ण झाले आहेत. काही फ्रेंचायझींची कामगिरी चांगली झाली आहे. तर काही संघ अजूनही लय मिळवण्यासाठी धडपड करत आहेत. असं असताना या वर्षी काही तरुण खेळाडूंनी आश्चर्यकारक कामगिरी करून लक्ष वेधलं आहे. आता हे खेळाडू भारतीय संघात प्रवेश करण्यास सज्ज आहेत. या यादीतील टॉप 5 खेळाडूंवर एक नजर टाकूया.

2 / 6
केकेआरकडून खेळणारा वेगवान गोलंदाज वैभव अरोरा याचं नाव या यादीत आघाडीवर आहे. वैभवने आतापर्यंत चार सामन्यांमध्ये सहा विकेट्स घेतल्या आहेत. तर गेल्या हंगामात त्याने 10 सामन्यांमध्ये 11 विकेट्स घेतल्या होत्या.

3 / 6
दिल्ली कॅपिटल्सकडून खेळणाऱ्या विप्रज निगमने आपल्या गोलंदाजी आणि फलंदाजीने सर्वांची मने जिंकली आहेत. पदार्पणाच्या सामन्यात 39 धावा केल्या. तसेच एक विकेट घेत विजयात हातभार लावला. तिसऱ्या सामन्यातही त्याने दोन विकेट्स घेतल्या. विप्रजकडे गोलंदाजीसह आक्रमक फलंदाजी करण्याची क्षमता आहे.

4 / 6
डावखुरा वेगवान गोलंदाज अश्वनी कुमारने मुंबई इंडियन्सकडून आयपीएल पदार्पणाच्या सामन्यात चार विकेट्स घेत आश्चर्यकारक कामगिरी केली. अश्वनीने आतापर्यंत दोन सामन्यांमध्ये पाच विकेट्स घेतल्या आहेत. त्याच्यासाठीही टीम इंडियाचं खुलं होऊ शकतं.

5 / 6
लखनौ सुपरजायंट्स संघाकडून खेळणारा मिस्ट्री स्पिनर दिग्वेश राठीने आपल्या गोलंदाजीने सर्वांना प्रभावित केले. राठीने पाच सामन्यात सात विकेट्स घेतल्या आहेत. त्याचा इकॉनॉमी रेटही आठच्या खाली आहे.

6 / 6
टीम इंडियामध्ये स्थान मिळवण्यासाठी पंजाब किंग्सकडून खेळणारा वादळी सलामीवीर प्रियांश आर्यचे नावही चर्चेत आले आहे. प्रियांशने चेन्नईविरुद्ध 39 चेंडूत शतक झळकावले. यामुळे भविष्यात हा खेळाडू टीम इंडियामध्ये दिसू शकतो. (सर्व फोटो- टीव्ही9 नेटवर्क)