
इंडियन प्रीमियर लीग 2025 स्पर्धेचे साखळी फेरीचे सामने शेवटच्या टप्प्यात आहेत. 57 सामने आधीच खेळले गेले आहेत. दिल्ली आणि पंजाब सामना रद्द करण्यात आला आहे. पण गुण काही दिलेले नाहीत. सामना खेळवला जाईल की नाही माहिती नाही. त्यामुळे 13 सामने शिल्लक आहेत. या 13 सामन्यानंतर कोणते 4 संघ प्लेऑफमध्ये खेळतील हे निश्चित होईल. या आधी दक्षिण आफ्रिकेचा माजी खेळाडू मार्क बाउचरने पुढील टप्प्यात जाणाऱ्या चार संघांची नावे जाहीर केली आहेत.

मुंबई इंडियन्सचे माजी प्रशिक्षक मार्क बाउचर यांच्या मते, गुजरात टायटन्स यावर्षीच्या आयपीएलमध्ये प्लेऑफमध्ये पोहोचेल. पॉइंट्स टेबलमध्ये आधीच अव्वल स्थानावर असलेला हा संघ पुढील तीन सामन्यांपर्यंत प्लेऑफमध्ये आपले स्थान निश्चित करेल.

अक्षर पटेलच्या नेतृत्वाखालील दिल्ली कॅपिटल्सला आणखी तीन सामने खेळायचे आहेत. पंजाब किंग्सविरुद्धचा सामना रद्द झाला आहे. पण पुन्हा खेळवला जाईल की नाही माहिती नाही. प्रत्येकी एक गुण मिळाला तरी दिल्लीला फायदा होऊ शकतं. मार्क बाउचर म्हणाले की, दिल्ली कॅपिटल्स उर्वरित सामने जिंकून प्लेऑफसाठी पात्र ठरेल.

मार्क बाउचरने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला प्लेऑफमध्ये पोहोचणारा तिसरा संघ म्हणून घोषित केले आहे. बाउचर म्हणाले की, आरसीबी संघाने या स्पर्धेत चांगली कामगिरी केली आहे. त्यामुळे रॉयल्सकडून प्लेऑफ फेरीतही अपेक्षा केली जाऊ शकते.

मुंबई इंडियन्स संघाचा प्लेऑफ फेरीत प्रवेश निश्चित असल्याचेही मार्क बाउचरे सांगितले. हार्दिक पंड्याच्या नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्स चांगली कामगिरी करत आहे. त्यामुळे उर्वरित सामन्यांमधून मुंबईही प्लेऑफमध्ये प्रवेश करेल, असा अंदाज मार्क बाउचरने वर्तवला आहे.