IPL 2025 Playoff : आयपीएलच्या बाद फेरीच्या सामन्यांचं संपूर्ण वेळापत्रक, एका क्लिकवर

आयपीएल स्पर्धेतील 70 सामन्यांचा अर्थात साखळी फेरीचा खेळ संपला आहे. 29 मे पासून प्लेऑफच्या सामन्यांना सुरुवात होणार आहे. आता फक्त चार सामने शिल्लक असून 18 व्या पर्वातील विजेता मिळणार आहे. पहिले तीन सामने हे अंतिम फेरीसाठी पात्र होण्यासाठी आहे. अंतिम सामना 3 जूनला होणार आहे.

| Updated on: May 28, 2025 | 2:58 PM
1 / 6
आयपीएल 2025 स्पर्धेचा थरार मागच्या दोन महिन्यांपासून सुरु आहे. आता या स्पर्धेचा अंतिम टप्पा जवळ आला आहे. आता चार सामन्यानंतर विजेता मिळणार आहे. दहा पैकी चार संघांनी प्लेऑफमध्ये जागा मिळवली आहे. या संघांमध्ये आता जेतेपदाची शर्यत असणार आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु, पंजाब किंग्स, गुजरात टायटन्स आणि मुंबई इंडियन्सने प्लेऑफमध्ये जागा मिळवली आहे.

2 / 6
गुणतालिकेत पंजाब किंग्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु हे टॉप 2 मध्ये आहेत. त्यामुळे या दोन संघात क्वॉलिफायर 1 चा सामना होणार आहे. तर मुंबई इंडियन्स आणि गुजरात टायटन्स यांच्यात एलिमिनेटर सामना होईल. चला जाणून घेऊयात वेळापत्रक

3 / 6
पहिल्या क्वालिफायरमध्ये पंजाब किंग्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू हे संघ आमनेसामने येतील. 29 मे रोजी हा सामना चंदीगडमधील मुल्लानपूर मैदानावर होणार आहे. हा सामना संध्याकाळी 7:30 वाजता सुरू होईल.

4 / 6
एलिमिनेटर सामन्यात मुंबई इंडियन्स आणि गुजरात टायटन्स आमनेसामने येतील. 30 मे रोजी हा सामना  मुल्लानपूर मैदानावर होणार आहे. हा सामना संध्याकाळी 7:30 वाजता सुरू होईल.

5 / 6
पहिल्या क्वॉलिफायर फेरीत जिंकणारा संघ थेट अंतिम फेरी गाठेल. म्हणजेच पंजाब किंग्स आणि आरसीबीकडे ही संधी आहे. तर एलिमिनेटर फेरीत पराभूत होणारा संघ बाहेर जाईल. म्हणजेच मुंबई इंडियन्स आणि गुजरात टायटन्ससाठी करो या मरोची लढाई आहे. यापैकी जिंकणारा संघ क्वॉलिफायर 2 मध्ये क्वॉलिफायर 1 मधील पराभूत संघाशी लढेल. दुसरा क्वॉलिफायर सामना 1 जून रोजी होईल.

6 / 6
आयपीएल 2025 स्पर्धेचा अंतिम सामना 3 जून रोजी होईल. हा सामना अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये होणार आहे. इंडियन प्रीमियर लीग सीझन 18 चा शेवट या सामन्याने होईल. हा सामना संध्याकाळी 7:30  वाजता सुरू होईल. (सर्व फोटो- टीव्ही 9 नेटवर्क)