
इंडियन प्रीमियर लीगच्या 18 वं पर्व कधी सुरु होणार याची तारीख निश्चित करण्यात आली आहे. यावर्षीचा आयपीएल 22 मार्चपासून सुरू होईल आणि 25 मे पर्यंत चालेल. विशेष म्हणजे यावेळी ओपनिंग आणि अंतिम सामने कोलकाता येथे होणार आहेत. चॅम्पियन्स ट्रॉफीचा शेवटचा सामना 9 मार्चला होणार आहे.

22 मार्च रोजी कोलकात्यातील ईडन गार्डन्सवर होणाऱ्या पहिल्या सामन्यात गतविजेता कोलकाता नाईट रायडर्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आमनेसामने येतील.

गेल्या वर्षीचा उपविजेता सनरायझर्स हैदराबाद आपला पहिला सामना घरच्या मैदानावर खेळेल. त्यानुसार, 23 मार्च रोजी उप्पल येथील राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर होईल. सनरायझर्स हैदराबादचा सामना राजस्थान रॉयल्सशी होईल.

आयपीएल स्पर्धेसाठी अहमदाबाद, मुंबई, चेन्नई, बेंगळुरू, लखनऊ, मुल्लानपूर, दिल्ली, कोलकाता, हैदराबाद आणि जयपूर, गुवाहटी, धर्मशाळा अशी 12 ठिकाणं निश्चित करण्यात आली आहे. पंजाब किंग्जचे सामने धर्मशाळा येथे होतील, तर राजस्थान रॉयल्सचे सामने गुवाहाटी येथे होतील.

कोलकात्यातील ईडन गार्डन्स स्टेडियम अंतिम सामना आयोजित करेल. हा सामना 25 मे रोजी होणार आहे. सुरुवातीची तारीख आणि अंतिम तारखांसह एक तात्पुरते वेळापत्रक आता सर्व फ्रँचायझींना पाठवण्यात आले आहे. त्यामुळे, आयपीएलचा 18 वा हंगाम 22 मार्च ते 25 मे दरम्यान होणार हे जवळजवळ निश्चित आहे.