IPL 2025 RCB In Final : जोश हेझलवूडने 3 विकेट रचला इतिहास, आयपीएलमध्ये पहिल्यांदाच असं घडलं

जोश हेझलवूडने दुखपातीनंतर आरसीबी संघात जोरदार कमबॅक केलं आहे. क्वॉलिफायर 1 च्या महत्त्वाच्या सामन्यात पंजाब किंग्सला लोळवण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. त्याने 3 विकेट घेत एक मोठा विक्रम आपल्या नावावर केला आहे.

| Updated on: May 29, 2025 | 10:27 PM
1 / 5
आयपीएल 2025 स्पर्धेच्या क्वॉलिफायर 1 सामन्यात आरसीबीने पंजाब किंग्सचा 8 विकेटने धुव्वा उडवला. या विजयासह अंतिम फेरीत स्थान मिळवलं आहे. नऊ वर्षानंतर आरसीबीने अंतिम फेरी गाठली आहे. या यशात जोश हेझलवूडचं मोठा हात आहे. त्याने दुखापतीनंतर कमबॅक केलं तसेच आरसीबीला यश मिळवून दिलं. (Photo- BCCI/IPL)

2 / 5
जोश हेझलवूडच्या भेदक गोलंदाजीमुळे पंजाब किंग्स संघ 101 धावांवर बाद झाला. जोश हेझलवूडने 21 धावा देत 3 महत्त्वाचे गडी बाद केला.  या शानदार कामगिरीने हेझलवूडने एक मोठा विक्रम आपल्या नावावर केला. (Photo- BCCI/IPL)

3 / 5
जोश इंगलिस, श्रेयस अय्यर आणि अझमतुल्लाह उमरझाई यांचे बळी घेत पंजाब किंग्जचे कंबरडे मोडले. या तिघांची विकेट काढल्यानंत हेझलवूडने आरसीबीसाठी एक खास विक्रम रचला आहे. (Photo- BCCI/IPL)

4 / 5
प्लेऑफमध्ये दोनदा तीन विकेट घेणारा हेझलवूड हा आरसीबीचा पहिला परदेशी गोलंदाज आहे. याआधी फक्त अनिल कुंबळेनेच ही कामगिरी केली होती. हेझलवूडच्या आगमनाने आरसीबीची गोलंदाजी खूपच मजबूत झाली आहे. (Photo- BCCI/IPL)

5 / 5
जोश हेझलवूड दुखापतीमुळे मागच्या दोन सामन्यांमध्ये खेळला नव्हता. त्याच्या गैरहजेरीत आरसीबीची गोलंदाजी खूपच कमकुवत दिसत होती. आरसीबीने सलग दोन सामन्यांमध्ये 220 पेक्षा जास्त धावा दिल्या होत्या. पण हेझलवूड परतल्याने सर्वच चित्र बदललं.  आरसीबीने पंजाबला फक्त 101 धावांत गुंडाळलं. (Photo- BCCI/IPL)