
आयपीएच्या 18 व्या मोसमाआधी (IPL 2025) 31 ऑक्टोबरला सर्व 10 फ्रँचायजींनी त्यांच्या संघातील कायम ठेवलेल्या खेळाडूंची नावं जाहीर केली. त्यामुळे करारमुक्त अर्थात रिलीज करण्यात आलेले सर्व खेळाडू हे आता मेगा ऑक्शनच्या रिंगणात असणार आहेत. तर दुसऱ्या बाजूला या रिटेन्शमधील सर्वात महाग ठरलेल्या 10 खेळाडूंबाबत आपण जाणून घेणार आहोत. सर्वात महाग ठरलेल्या खेळाडूला 23 कोटी रुपयांमध्ये रिटेन केलं गेलं आहे. तर सर्वात महाग ठरलेल्या भारतीय खेळाडूला 21 कोटी रुपयांमध्ये कायम ठेवलं गेल आहे. या रिटेन्शननंतर महाग ठरलेल्या 10 खेळाडूंबाबत आपण जाणून घेऊयात.

अफगाणिस्तानच्या करामती ऑलराउंडर राशिद खान याला गुजरात टायटन्सने 18 कोटी रुपये देऊन रिटेन केलं आहे.

ऑस्ट्रेलियाचा कसोटी कर्णधार पॅट कमिन्स याला सनरायजर्स हैदराबादने रिटेन केलं आहे. पॅटला या रिटेन्शमुळे 2 कोटी 50 लाख रुपयांचा तोटा झाला आहे. हैदराबादने कमिन्सला 18 कोटी रुपये मोजून रिटेन केलं आहे. तर गेल्या वेळेस हैदराबादने पॅटला 20 कोटी 50 लाख रुपये दिले होते.

टीम इंडियाचा युवा सलामीवीर यशस्वी जयस्वाल याला राजस्थान रॉयल्सने रिटेन केलं आहे. राजस्थानने यशस्वीला 18 कोटी रुपयात रिटेन केलं आहे.

टीम इंडियाचा विकेटकीपर बॅट्समन संजू सॅमसन यालाही राजस्थान रॉयल्सने रिटेन केलंय. राजस्थानने संजूला यशस्वीइतकेच अर्थात 18 कोटी रुपये मोजून आपल्यासह कायम ठेवलं आहे.

यॉर्कर किंग जसप्रीत बुमराह याला मुंबई इंडियन्सने रिटेन केलं आहे. पलटणने एकूण 5 खेळाडू रिटेन केले. त्यापैकी सर्वाधिक रक्कम ही जसप्रीत बुमराह याला देण्यात आली. बुमराहला 18 कोटी रुपयात रिटेन केलं गेलं आहे. (Photo Credit : BCCI/IPL)

चेन्नई सुपर किंग्सने ऑलराउंडर रवींद्र जडेजा याला आपल्यात ताफ्यात कायम ठेवलं आहे. सीएसकेने 'सर' जडेजसाठी 18 कोटींनी खिसा रिकामा केला आहे.

आयपीएलच्या 17 व्या मोसमात विकेटकीपिंग, बॅटिंगसह चेन्नई सुपर किंग्सचं नेतृत्व करणाऱ्या पुणेकर ऋतुराज गायकवाड याला 18 कोटींमध्ये रिटेन केलं गेलं आहे.

विंडिजचा विस्फोटक फलंदाज निकोलस पूरन याच्यावर पैशांचा पाऊस पाडण्यात आला आहे. लखनऊ सुपर जायंट्सने पूरनसाठी 21 कोटी रुपये मोजले आहेत.

आरसीबीचा अनुभवी फलंदाज आणि माजी कर्णधार विराट कोहली याला 21 कोटी रुपये मिळाले आहेत. विराट सर्वात महागडा भारतीय खेळाडू ठरला आहे.

दक्षिण आफ्रिकेचा विस्फोटक फलंदाज हेन्रिक क्लासेन याला सर्वाधिक रक्कम मिळाली आहे. क्लासेनसाठी सनरायजर्स हैदराबादने 23 कोटी रुपये मोजले आहेत.