IPL 2025 : अनसोल्ड शार्दुल ठाकुरची कमाल, दुसऱ्या सामन्यात घेतली मानाची ‘पर्पल कॅप’

सनरायझर्स हैदराबादविरुद्ध शार्दुल ठाकूरने भेदक गोलंदाजीचं दर्शन घडवलं. त्याने चार षटकांत 34 धावा देत 4 बळी घेतले. यासह या पर्वातील नंबर 1 गोलंदाजही ठरला आहे. त्याला पर्पल कॅपने सन्मानित करण्यात आले आहे. विशेष म्हणजे मेगा लिलावात त्याला कोणत्याही संघाने खरेदी केले नाही.

| Updated on: Mar 27, 2025 | 10:22 PM
1 / 5
आयपीएल 2025 चा सातवा सामना सनरायझर्स हैदराबाद आणि लखनौ सुपर जायंट्स यांच्यात खेळला गेला. या सामन्यात लखनौकडून खेळणाऱ्या शार्दुल ठाकूरने यजमान हैदराबादविरुद्ध कहर केला. (Photo- PTI)

2 / 5
या सामन्यात शार्दुलने 4 षटकांत 34 धावा देत 4 बळी घेतले आणि हैदराबादला बॅकफूटवर ढकललं. या विकेटसह हंगामातील नंबर1  गोलंदाजही बनला आहे. त्याला पर्पल कॅपने सन्मानित करण्यात आले आहे. (Photo- LSG Twitter)

3 / 5
आतापर्यंत खेळल्या गेलेल्या सामन्यांमध्ये शार्दुल ठाकूरने सर्वाधिक विकेट्स घेतल्या आहेत. त्याने 2 सामन्यात 6 विकेट्स घेतल्या आहेत. दुसरीकडे, शार्दुल ठाकूरने आयपीएलमध्ये 97 सामन्यांमध्ये 100 विकेट्स पूर्ण केल्या आहेत.(Photo- LSG Twitter)

4 / 5
पहिल्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध 2 विकेट घेतलेल्या. हैदराबादविरुद्ध पॉवरप्लेमध्येच अभिषेक शर्मा आणि इशान किशन सारख्या आक्रमक फलंदाजांच्या विकेट काढल्या. डेथ ओव्हरमध्ये मोहम्मद शमी आणि अभिनव मनोहर यांनाही बाद केले. (Photo- LSG Twitter)

5 / 5
शार्दुल ठाकूरने आयपीएल 2025 मध्ये छाप पाडली आहे. मेगा लिलावात त्याला कोणत्याही संघाने विचारलेही नव्हते. 2 कोटी रुपयांच्या बेस प्राईससह मेगा लिलावात प्रवेश केला होता. लखनौचा मोहसिन खान दुखापतग्रस्त झाल्याने त्याला संघात एन्ट्री मिळाली. त्याने या संधीचं सोनं केलं. (Photo- LSG Twitter)