
सनरायझर्स हैदराबादने 68व्या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 278 धावा केल्या. तसेच कोलकाता नाईट रायडर्सला 18.4 षटकात 168 धावांवर सर्वबाद केलं. यासह हैदराबादने टी20 क्रिकेटमध्ये इतिहास रचला आहे. तसेच टीम इंडियाचा विश्वविक्रम मोडीत काढला आहे. टी20 क्रिकेटमध्ये 250 हून अधिक धावा करणारा संघ ठरला आहे. (Photo- PTI/IPL/BCCI)

इंडियन प्रीमियर लीगमध्ये राजस्थान रॉयल्सविरुद्ध 286 धावा करून मोहिमेची सुरुवात केली होती. तसेच या स्पर्धेत 300 धावा करण्याचं लक्ष ठेवलं होतं. पण तसं काही घडलं नाही. पण सनरायझर्स हैदराबादने शेवटच्या लीग सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध 278 धावा केल्या. (Photo- IPL/BCCI)

टी20 क्रिकेट इतिहासात पाचवेळा 250 पेक्षा जास्त धावा करणारा एकमेव संघ बनला आहे. याआधी सनरायझर्स हैदराबादने 2024 मध्ये 287 धावा, 277 धावा आणि 266 धावा केल्या होत्या. तर या वर्षीच्या आयपीएलमध्ये 286 आणि 278 धावा करून 250हून अधिक धावा पाच वेळा गाठल्या आहेत. यासह टी20 क्रिकेटमध्ये एक खास विश्वविक्रम प्रस्थापित झाला आहे. (Photo- IPL/BCCI)

भारतीय संघाने टी20 क्रिकेटमध्ये तीन वेळा 250 धावांचा टप्पा ओलांडला आहे. टीम इंडियाने 2024 मध्ये बांगलादेशविरुद्ध 297 धावा आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 283 धावा केल्या होत्या. 2017 मध्ये श्रीलंकेविरुद्ध 260 धावा केल्या. (Photo- PTI)

सनरायझर्स हैदराबाद संघाने दोन वर्षातच टीम इंडियाचा विक्रम मोडीत काढला आहे. 2024 मध्ये तीन वेळा 250 हून अधिक धावांचा टप्पा ओलांडला होता. तर यंदा 286 आणि 278 धावा केल्या आहेत. या कामगिरीसह भारतीय संघाचा पूर्वीचा विश्वविक्रम मोडला आहे. (Photo- IPL/BCCI)