
आयपीएल 2025 स्पर्धेच्या अंतिम फेरीत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने धडक मारली आहे. क्वॉलिफायर 1 फेरीत पंजाब किंग्सचा धुव्वा उडवत अंतिम फेरी गाठली आहे. आता पंजाब किंग्स, मुंबई इंडियन्स किंवा गुजरात टायटन्स यापैकी एक संघ प्रतिस्पर्धी असेल. (Photo- BCCI/IPL)

आरसीबीची झोळी 17 वर्षांपासून रितीच आहे. यापूर्वी तीन वेळा अंतिम फेरी गाठली होती. मात्र तिन्ही वेळेस पराभवाचं तोंड पाहावं लागलं होतं. आता 3 जूनला आरसीबी पुन्हा जेतेपदाचं स्वप्न उराशी बाळगून उतरेल. या सामन्यात टिम डेव्हिड खेळेल हे जवळपास निश्चित आहे. (Photo- BCCI/IPL)

सनरायझर्स हैदराबादविरुद्ध क्षेत्ररक्षण करताना हॅमस्ट्रिंगला दुखापत झालेल्या टिम डेव्हिडला लखनौ सुपरजायंट्स आणि पंजाब किंग्जविरुद्धच्या सामन्यांमध्ये खेळता आले नाही. त्याच्या जागी खराब फॉर्ममध्ये असलेल्या लियाम लिव्हिंगस्टोनला संधी देण्यात आली. (Photo- BCCI/IPL)

टिम डेव्हिड आता बरा झाला आहे आणि अहमदाबादमध्ये सराव सुरू करेल असे वृत्त आहे. टिम डेव्हिड पुढील दोन दिवस सराव करणार आहे. जर यावेळी त्याच्या पायाला काही अडचण आली नाही तर तो निश्चितच अंतिम फेरीत भाग घेऊ शकेल. (Photo- BCCI/IPL)

आरसीबीचा संपूर्ण संघ : विराट कोहली , फिलिप सॉल्ट , रजत पाटीदार (कर्णधार) , लियाम लिव्हिंगस्टोन , जितेश शर्मा (विकेटकीपर) , रोमॅरियो शेफर्ड , कृणाल पांड्या , भुवनेश्वर कुमार , यश दयाल , जोश हेजलवूड , सुयश शर्मा, मयंक अग्रवाल , रसिक दार सलाम , मनोज भंडागे , टिम सेफर्ट , स्वप्नील सिंग , नुवान तुषारा , ब्लेसिंग मुजराबानी , टिम डेव्हिड , मोहित राठी , स्वस्तिक चिकारा , अभिनंदन सिंग. (Photo- BCCI/IPL)