IPL 2026 : अभिषेक शर्माने 21 चेंडूत 4 षटकारांच्या मदतीने ठोकलं अनोखं ‘त्रिशतक’
आयपीएल 2026 स्पर्धेच्या दुसऱ्या सामन्यात अभिषेक शर्माला सूर गवसल्याचं दिसलं. त्याने 21 चेंडूत 48 धावा केल्या. यावेळी त्याने एक अनोखं त्रिशतक ठोकलं.

आयपीएल 2026 स्पर्धेत सनरायझर्स हैदराबाद संघाला पहिल्या पराभवाला सामोरं जावं लागलं. या सामन्यात अभिषेक शर्मा काही खास करू शकला नाही. पण कोलकाता नाईट रायडर्स विरूद्धच्या दुसऱ्या सामन्यात अभिषेक शर्माला सूर गवसला. (Photo: SRH Twitter)

अभिषेक शर्माने आपल्या आक्रमक खेळीचं दर्शन घडवलं. त्याने आक्रमक खेळी करत संघाची धावगती वाढवण्यास मदत केली. अभिषेक शर्माने 21 चेंडूत 48 धावांची खेोळी केली. या खेळीत त्याने 4 चौकार आणि 4 षटकार मारले. (Photo: SRH Twitter)

अभिषेक शर्माने वरूण चक्रवर्तीच्या षटकात 2 षटकार आणि तीन चौकार मारत 24 धावा काढल्या. तर वाइड चेंडू टाकल्याने एकूण 25 धावा आल्या. आपल्या खेळीत अभिषेक शर्माने 4 षटकार मारत एक अनोखं त्रिशतक साजरं केलं. (Photo: SRH Twitter)

अभिषेक शर्माने टी20 क्रिकेट कारकिर्दीत 300 षटकार मारले आहे. टी20 फॉर्मेटमध्ये सलामीला येत 300 किंवा त्याहून अधिक षटकार दुसरा भारतीय सलामीवीर ठरला आहे. रोहित शर्मा या यादीत अव्वल स्थानी असून त्याने 330 षटकार मारलेत. (Photo: BCCI/IPL)

अभिषेक शर्माने टी20 क्रिकेटमध्ये 301 षटकार मारले असून दुसऱ्या स्थानावर आहे. तर सनरायझर्स हैदराबादसाठी 100 पेक्षा अधिक षटकार मारणारा पहिला भारतीय फलंदाज ठरला आहे. (Photo: BCCI/IPL)