IPL 2026 : केएल राहुलला लॉटरी;आयपीएलमध्ये केकेआरच्या कर्णधारपदाची जबाबदारी मिळणार! रहाणेचा पत्ता कट?

IPL 2026 KL Rahul : विकेटकीपर बॅट्समन केएल राहुल वर्षभरापूर्वी लखनौ सुपर जायंट्सची साथ सोडत दिल्ली कॅपिट्ल्स संघात सामील झाला होता. आता केएल आगामी हंगामात नव्या जर्सीत दिसणार असल्याची चर्चा रंगली आहे.

| Updated on: Oct 15, 2025 | 9:41 PM
1 / 5
टीम इंडियाचा अनुभवी फलंदाज केएल राहुल याने  नुकत्याच विंडीज विरुद्ध झालेल्या 2 सामन्यांच्या कसोटी मालिकेत उल्लेखनीय कामगिरी केली. त्यानंतर केएल टीम इंडियासह ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी रवाना झाला आहे. अशातच आता केएलबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. आयपीएलच्या आगामी 19 व्या मोसमाआधी (IPL 2026) केएल टीम बदलणार असल्याचा दावा मीडिया रिपोर्ट्समध्ये केला जात आहे. (Photo Credit : PTI)

2 / 5
रिपोर्ट्सनुसार, केएलची कोलकाता नाईट रायडर्स टीमसह बोलणी सुरु असल्याचं म्हटलं जात आहे. केएलला केकेआरकडून कर्णधार, विकेटकीपिंग आणि ओपनिंगची जबाबदारी दिली जाऊ शकते. (Photo Credit : PTI)

3 / 5
श्रेयस अय्यर याने त्याच्या नेतृत्वात 2023 साली केकेआरला चॅम्पियन केलं. श्रेयसला करारमुक्त केल्यानंतर केकेआरच्या कर्णधारपदी अजिंक्य रहाणे याची नियुक्ती करण्यात आली. मात्र रहाणेच्या नेतृत्वात केकेआरला प्लेऑफमध्येही पोहचता आलं नाही. अशात आता रहाणेच्या कर्णधारपदावर टांगती तलवार आहे. (Photo Credit : PTI)

4 / 5
केएलने आयपीएलच्या 18 व्या मोसमात दिल्ली कॅपिट्ल्संचं प्रतिनिधित्व केलं. दिल्लीने केएलसाठी 14 कोटी मोजले.केएलने गत हंगामात 54 च्या सरासरीने 1 शतक आणि 3 अर्धशतकांसह एकूण 539 धावा केल्या. (Photo Credit : PTI)

5 / 5
आता केएल दिल्ली टीमसह कायम राहणार की साथ सोडणार? हे अधिकृत घोषणा झाल्यावरच समजेल. मात्र राजस्थान रॉयल्सचा विकेटकीपर आणि कॅप्टन दिल्लीच्या वाटेवर असल्याचं म्हटलं जात आहे. (Photo Credit : PTI)