GT vs DC: आयपीएल स्पर्धेत गुजरातचा अवघ्या एका धावेने विजय, विक्रमासह असा जुळून आला योग
आयपीएल 2026 स्पर्धेतील 14वा सामना रोमहर्षक झाला. या सामन्यात गुजरात टायटन्सने दिल्ली कॅपिटल्सवर अवघ्या एका धावेने विजय मिळवला. या सामन्यात काही विक्रम नोंदवले गेले. तर काही योगायोगही जुळून आले. चला जाणून घेऊयात सविस्तर

आयपीएल 2026 स्पर्धेच्या 14 व्या सामन्यात गुजरात टायटन्सने 20 षटकात 4 गडी गमवून 210 धावा केल्या. तसेच विजयासाठी 211 धावांचं आव्हान दिलं. दिल्ली कॅपिटल्सने 20 षटकात 8 गडी गमवून 209 धावा केल्या आणि अवघ्या एका धावेने पराभव झाला. (Photo: IPL/BCCI)

दिल्ली कॅपिटल्सने धावांचा पाठलाग करताना पावरप्लेच्या सहा षटकात 10.5 च्या रनरेटने 63 धावा केल्या. 7 ते 15 षटकांच्या दरम्यान 4 गडी गमवून 79 धावा केल्या. यावेळी नेट रनरेट हा 8.77 होता. तर 16 ते 20 षटकात 4 गडी गमवून 13.40 च्या नेट रनरेटने 67 धावा केल्या. (Photo: IPL/BCCI)

प्रसिद्ध कृष्णा आणि डेविड मिलरचा आमनासामना दोन वेळा झाला आहे. 2022 मध्ये क्वॉलिफायर 1 फेरीत राजस्थानविरुद्ध गुजरातला 6 चेंडूत 16 धावांची गरज होती. तेव्हा प्रसिद्धच्या गोलंदाजीवर सलग 3 षटकार मारले आणि गुजरात टायटन्स जिंकला होता. त्यानंतर 2026 मध्ये दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्स सामना झाला. यावेळी दिल्ली कॅपिटल्सला 3 चेंडूत 8 धावांची गरज होती. तेव्हा डेविड मिलर 6 धावा करू शकला आणि हा सामना गुजरात एका धावेने जिंकला होता. (Photo: IPL/BCCI)

दिल्ली कॅपिटल्सचा आयपीएल स्पर्धेत चौथ्यांदा एका धावेने पराभव झाला आहे. इतक्या कमी फरकाने सामना गमावलेला दिल्ली कॅपिटल्स हा पहिला संघ आहे. 2015 मध्ये चेन्नईविरुद्ध, 2016 मध्ये गुजरात लायन्सविरुद्ध, 2021 मध्ये आरसीबीविरूद्ध आणि 2026 मध्ये गुजरात टायटन्सविरुद्ध एका धावेने सामना गमावला आहे. (Photo: IPL/BCCI)

गुजरात टायटन्सने सर्वात कमी अंतराने सामना जिंकण्याची ही पाचवी वेळ आहे. आयपीएल 2026 दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध 1 धावेने, 2024 मध्ये मुंबई इंडियन्सविरूद्ध 6 धावांनी, 2023 मध्ये लखनौ विरुद्ध 7 धावांनी, 2022 मध्ये केकेआरविरुद्ध 8 धावांनी आणि 2022 मध्ये दिल्ली कॅपिटल्सविरुध्ये 14 धावांनी विजय मिळवला होता. (Photo: IPL/BCCI)