Bhuvneshwar Kumarचं ऐतिसिक द्विशतक, IPL स्पर्धेत अशी कामगिरी करणारा पहिलाच वेगवान गोलंदाज
Bhuvneshwar Kumar 200 IPL Matches: लखनौतील एकाना स्टेडियममधील सामना आरसीबीचा वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमार याच्यासाठी अविस्मरणीय आणि ऐतिहासिक ठरला आहे. जाणून घ्या भुवीने या स्पर्धेत असं काय केलं?

आयपीएल स्पर्धेच्या 19 व्या मोसमातील 50 व्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु विरुद्ध लखनौ सुपर जायंट्स आमनेसामने आहेत. आरसीबीचा वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमार याने या सामन्यासाठी मैदानात उतरताच इतिहास घडवला. (PHOTO CREDIT- PTI)

भुवीच्या आयपीएल कारकीर्दीतील लखनौ विरुद्धचा हा एकूण 200 वा सामना ठरला. भुवी यासह आयपीएल स्पर्धेत 200 सामने खेळणारा पहिला वेगवान गोलंदाज ठरला आहे. भुवी व्यतिरिक्त एकाही वेगवान गोलंदाजाला 190 सामनेही खेळता आलेले नाहीत. (PHOTO CREDIT- PTI)

भुवीने 2011 साली पुणे वॉरियर्स इंडियाकडून आयपीएल स्पर्धेत पदार्पण केलं. त्यानंतर भुवीने अनेक वर्ष सनरायजर्स हैदराबादचं प्रतिनिधित्व केलं. त्यानंतर भुवी 18 व्या मोसमापासून आरसीबीसाठी खेळत आहेत. (PHOTO CREDIT- PTI)

भुवीने आयपीएल कारकीर्दीत आतापर्यंत 200 पेक्षा अधिक विकेट्स मिळवल्या आहेत. भुवी या स्पर्धेत 20 पेक्षा अधिक विकेट्स मिळवणारा एकमेव वेगवान गोलंदाज आहे. (PHOTO CREDIT- PTI)

भुवी आयपीएल स्पर्धेत एकूण आणि सलग 2 वेळा पर्पल कॅप जिंकणारा एकमेव गोलंदाज आहे. भुवीने 2016 आणि 2017 साली ही कामगिरी केली आहे. एका मोसमात सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या गोलंदाजाला पर्पल कॅप देण्यात येते. (PHOTO CREDIT- PTI)