IPL 2026 Auction: फक्त 4 सामनेच खेळणार, तरीही फ्रँचायजीकडून कोटींचा भाव, कोण आहे तो?

IPL 2026 Auction : मिनी ऑक्शनमधून अनेक खेळाडू मालामाल झाले. युवा खेळाडू कोट्याधीश झाले. मात्र लखनौ सुपर जायंट्सने अशा एका खेळाडूला आपल्या ताफ्यात घेतलंय जो 19 व्या मोसमात केवळ 4 सामनेच खेळणार आहे.

| Updated on: Dec 16, 2025 | 10:25 PM
1 / 5
आयपीएल 2026 साठी दुबईत 16 डिसेंबर रोजी मिनी ऑक्शन पार पडलं. या मिनी ऑक्शनमधून ऑस्ट्रेलियाचा विकेटकीपर बॅट्समन जोश इंग्लिस याला लखनौ सुपर जायंट्सने आपल्या ताफ्यात घेतलं. लखनौने इंग्लिससाठी 8 कोटी 60 लाख रुपये मोजले.  (Photo Credit : PTI)

2 / 5
जोस इंग्लिस याला त्याच्या लौकीकापेक्षा कमी भाव मिळाल्याचं म्हटलं जात आहे. मात्र इंग्लिस या 19 व्या हंगामात केवळ 4 सामनेच खेळणार आहे. मात्र त्यानंतरही इंग्लिसला 8 कोटींपेक्षा जास्त भाव मिळाला. (Photo Credit : PTI)

3 / 5
जोश इंग्लिस याचं आयपीएल 2026 च्या मोसमादरम्यान लग्न होणार आहे. त्यामुळे इंग्लिस फक्त 4 सामन्यांसाठी उपलब्ध असणार आहे. इंग्लिसने ऑक्शनआधीच याबाबत कळवलं होतं. मात्र त्यानंतरही लखनौने इंग्लिससाठी इतकी मोठी बोली लावली. (Photo Credit : PTI)

4 / 5
जोशला आपल्या गोटात घेण्यासाठी लखनौला आणि सनरायजर्स हैदराबाद यांच्यात चुरस पाहायला मिळाली. हैदराबादने इंग्लिससाठी 8 कोटी 40 लाख इतकी बोली लावली. मात्र लखनऊने मैदान मारलं आणि इंग्लिसला आपल्या ताफ्यात घेतलं. (Photo Credit : PTI)

5 / 5
जोशने आयपीएलच्या 18 व्या हंगामातील 11 सामन्यांमध्ये 278 धावा केल्या. जोश टॉपपासून लोअर ऑर्डरमध्ये कुठेही बॅटिंग करु शकतो. आता जोश या आगामी मोसमातील 4 सामन्यांमध्ये कशी कामगिरी करतो? याच्याकडे टीम मॅनेजमेंटचं लक्ष असणार आहे. (Photo Credit : PTI)