IPL 2026, PBKS vs GT: पंजाब गुजरात सामन्यातील खेळपट्टी नंबर 4 कशी आहे? कोणाला होणार फायदा?
PBKS vs GT: आयपीएल स्पर्धेतील तीन सामन्यांचा खेळ संपला असून चौथ्या सामन्यात पंजाब किंग्स आणि गुजरात टायटन्स हे संघ आमनेसामने येणार आहेत. हा सामना पंजाबच्या होमग्राउंडवर होणार आहे. खेळपट्टी कशी आहे ते जाणून घ्या

Punjab Kings vs Gujrat Titans: आयपीएल 2026 स्पर्धेतील चौथा सामना पंजाब किंग्स आणि गुजरात टायटन्स यांच्यात खेळला जाणार आहे. हा सामना मुल्लांपूरच्या खेळपट्टी नंबर 4 वर होणार आहे. या खेळपट्टीवर धावांचा वर्षाव होतो, असा भुतकाळ आहे. चला जाणून घेऊयात काय ते. (Photo: PTI)

मुल्लांपूरच्या खेळपट्टी नंबर 4 शेवटची आयपीएल सामना पंजाब किंग्स आणि चेन्नई सुपर किंग्स यांच्यात खेळला गेला. या सामन्यात एकूण 24 षटकार आले आणि एकूण 420 धावा झाल्या. त्यामुळे या खेळपट्टीवर मोठी धावसंख्या होते असं दिसतंय. त्यामुळे पंजाब किंग्सचे कोच रिकी पाँटिंग यांनी हायस्कोअरिंग सामन्याची अपेक्षा केली आहे. (Photo: PTI)

पंजाब किंग्सने या खेळपट्टीवर 20 षटकात 219 धावा केल्या होत्या. यात ओपनर प्रियांश आर्याने शतकी खेळी करत मोठी भूमिका बजावली होती. त्याने 9 षटकारांच्या मदतीने 42 चेंडूत 103 धावा केल्या होत्या. तर चेन्नई सुपर किंग्सचा संघ 201 धावा करू शकला. (Photo: PTI)

मुल्लांपूरचा सामना पंजाब किंग्सचा कर्णधार श्रेयस अय्यरसाठी तितका चांगला नाही. त्याने या मैदानात एकूण 5 सामने खेळले असून फक्त 27 धाव केल्या आहे. त्याचा या मैदानातील सर्वोत्तम स्कोअर हा 10 आहे. त्यात स्ट्राईक रेटही खूपच कमी आहे. (Photo: PTI)

गुजरात टायटन्स या सामन्यात कशी कामगिरी करते याकडेही लक्ष असणार आहे. कारण बऱ्याच कालावधीनंतर टी20 संघाचं नेतृत्व शुबमन गिल करणार आहे. मागच्या पर्वात त्याने 650 धावा केल्या होत्या. त्यामुळे या पर्वातही त्याच्याकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा आहे. (Photo: PTI)