IPL 2026: रजत पाटीदारने सर्वात वेगाने 100 षटकार मारण्याचा विक्रम रचला, वैभव सूर्यवंशी कुठे आहे?

आयपीएल 2026 स्पर्धेत आरसीबीचा शेवटचा साखळी फेरीचा सामना सनरायझर्स हैदराबादविरुद्ध पार पडला. या सामन्यात आरसीबीचा पराभव झाल. पण कर्णधार रजत पाटीदारने अर्धशतकी खेळीसह एक खास विक्रम आपल्या नावावर केला आहे.

| Updated on: May 23, 2026 | 2:52 PM
1 / 5
आयपीएल स्पर्धेत रजत पाटीदारच्या नेतृत्वात आरसीबीने जबरदस्त कामगिरी केली आहे. मागच्या पर्वात जेतेपदावर नाव कोरलं. तर यंदाही प्लेऑफमध्ये स्थान पक्कं केलं असून क्वॉलिफायर 1 मध्ये खेळणार आहे. असं असताना रजत पाटीदाराने षटकारांचा एक विक्रम आपल्या नावावर केला आहे. (Photo: PTI)

2 / 5
रजत पाटीदारने सनरायझर्स हैदराबादविरुद्धच्या सामन्यात 39 चेंडूत 56 धावा केल्या. यात सहा चौकार आणि एकच षटकार मारला. पण हा एक षटकार खूपच खास होता. कारण त्याने आयपीएल स्पर्धेत वेगाने षटकारांचं शतक पूर्ण केलं आहे. (Photo: PTI)

3 / 5
रजत पाटीदारने अवघ्या 933 चेंडूत आयपीएलमध्ये षटकारांचं शतक पूर्ण केलं. हे आयपीएल स्पर्धेच्या इतिहासातील तिसरं वेगवान षटकारांचं शतक आहे. हा रेकॉर्ड सध्या तरी आंद्रे रसेलच्या नावावर आहे. त्याने 657 चेंडूत षटकारांचं शतक पूर्ण केलं. निकोलस पूरनने 884 चेंडूत,  ख्रिस गेलने 943 चेंडूत शतकी षटकार मारला. (Photo: PTI)

4 / 5
रजत पाटिदारने शिवम दुबेचा विक्रम मोडीत काढला. त्याने 992 चेंडूत शतकी षटकार मारले होते. आता आरसीबीचा कर्णधार रजत पाटिदारचा विक्रम कोण मोडणार? याची उत्सुकता आहे. आता हा विक्रम 15 वर्षीय वैभव सूर्यवंशीच्या रडारवर आहे. त्याने 53 षटकार मारले आहेत. (Photo: PTI)

5 / 5
राजस्थान रॉयल्सचा ओपनर आतापर्यंत आयपीएलची दोन पर्व खेळली आहेत. त्याने आयपीएल कारकि‍र्दीत 367 चेंडूत 77 षटकार मारले. आता त्याने 23 षटकार मारले तर रजत पाटिदारच नाही तर आंद्रे रसेलचा विक्रमही मोडू शकतो. (Photo: PTI)

Follow Us