IPL 2026: मिचेल स्टार्कने पहिल्याच सामन्यात तीन विकेट काढल्या, नावावर केला खास विक्रम

आयपीएल 2026 स्पर्धेत मिचेल स्टार्कने पहिला सामना खेळला. दुखापतीमुळे मिचेल स्टार्क आयपीएल स्पर्धेच्या पहिल्या टप्प्यात खेळू शकला नाही. पण पहिल्याच सामन्यात तीन विकेट काढून खास कारनामा केला.

| Updated on: May 01, 2026 | 9:51 PM
1 / 5
मिचेल स्टार्कचं दिल्ली कॅपिटल्स संघात आगमन होताच ताकद वाढली आहे. कारण त्याच्यामुळे चार षटकांचा खेळ सोपा होतो. त्याने मैदानावर पाऊल ठेवताच आपला दर्जा दाखवून दिला आहे. आयपीएल 2026 मधील आपला पहिला सामना खेळताना मिचेल स्टार्कने जबरदस्त गोलंदाजी करत तीन बळी घेतले.  (Photo: Delhi Capitals Twitter)

2 / 5
मिचेल स्टार्कने राजस्थान रॉयल्सविरुद्ध खेळताना यशस्वी जैस्वालची पहिली विकेट काढली. त्याला पहिल्याच षटकात चालतं केलं.. त्यानंतर स्टार्कने राजस्थानचा कर्णधार रियान परागला 90 धावांवर बाद केलं. त्याला  शतक करण्यापासून रोखले. स्टार्कने जडेजालाही बाद केले. (Photo: Delhi Capitals Twitter)

3 / 5
मिचेल स्टार्क शेवटच्या षटकात महागडा ठरला. त्याने 19व्या षटकात 14 धावा दिल्या. डोनोव्हान फरेराने त्याच्या षटकात एक चौकार आणि एक षटकार मारला. यामुळे स्टार्कने चार षटकांत 40 धावा दिल्या. (Photo: Delhi Capitals Twitter)

4 / 5
दरम्यान, यशस्वी जयस्वालची विकेट पहिल्याच षटकात काढत त्याने एक कारनामा केला आहे. पहिल्याच षटकात विकेट घेण्याची स्टार्कला सवय झाल्याचं दिसून आलं आहे. त्याने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्याच्या पहिल्याच षटकात विकेट घेतली होती. त्याने एशेस मालिकेच्या पहिल्या षटकातही विकेट घेतली होती. (Photo: IPL/BCCI)

5 / 5
2026 मध्ये झालेल्या पहिल्या कसोटी सामन्यातही त्याने विकेट घेतली होती. मिचेल स्टार्कने बिग बॅश लीगच्या पहिल्या षटकातही विकेट घेतली होती आणि आता त्याने आयपीएलमध्ये ही कामगिरी केली आहे. त्यामुळे पहिलं षटक आणि विकेट मिळवणं हे समीकरण जुळून आलं आहे. (Photo: Delhi Capitals Twitter)

Follow Us