IPL 2026: गिल-सुदर्शन जोडीसोबत चौथ्यांदा असं घडलं, एक मोठा विक्रम मोडता मोडता राहिला
आयपीएल 2026 स्पर्धेच्या अंतिम फेरीत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि गुजरात टायटन्स हे संघ आमनेसामने आहे. या सामन्यात गुजरात टायटन्सचा संघ 155 धावा करू शकला. तसेच शुबमन गिल आणि साई सुदर्शन ही जोडीही स्वस्तात बाद झाला.

आयपीएल 2026 अंतिम सामन्यात गुजरात टायटन्सची स्टार फलंदाज जोडी फेल गेली. कर्णधार शुबमन गिल 10 धावांवर, तर साई सुदर्शन 12 धावा करून बाद झाला. त्यामुळे गुजरात टायटन्सचा डावही पत्त्यासारखा कोसळला. (Photo: PTI)

आयपीएल 2026च्या संपूर्ण पर्वात चौथ्यांदा शुबमन गिल आणि साई सुदर्शन ही जोडी पावरप्लेच्या आत बाद झाली आहे. विशेष म्हणजे चार पैकी तीन वेळा आरसीबीविरुद्ध असं घडलं आहे. (Photo: PTI)

शुबमन गिल आणि साई सुदर्शन या पर्वात ऐतिहासिक कामगिरी करणार असं वाटलं होतं. अंतिम फेरीत या जोडीच्या कामगिरीकडे लक्ष होतं. पण ही जोडी स्वस्तात बाद झाली. या जोडीने या सामन्यात चांगली कामगिरी केली असती तर विक्रम रचला असता. या जोडीने या पर्वात एकूण 908 धावा केल्या. (Photo: PTI)

आयपीएल पर्वात सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम विराट कोहली-फाफ डुप्लेसिस आणि विराट कोहली-एबी डिव्हिलियर्स या जोडीच्या नावावर आहे. विराट-फाफने 2023 मध्ये 939 धावा केल्या होत्या. विराट डिव्हिलियर्स जोडीने 2016 मध्ये 939 धावा केल्या होत्या. (Photo: PTI)

शुबमन गिल आणि साई सुदर्शन जोडी विक्रम मोडण्यात अपयशी ठरले. पण या जोडीन वेगवेगळ्या पर्वात 900हून अधिक धावांची भागीदारी केली आहे. अशी कामगिरी करणारी पहिली जोडी ठरली. (Photo: PTI)