SRH vs LSG: मोहम्मद शमीने 4 षटकात 18 चेंडू टाकले निर्धाव, दोन विकेट काढत असा होता स्पेल
आयपीएल 2026 स्पर्धेतील दहाव्या सामन्यात लखनौ सुपर जायंट्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात लढत होत आहे. या सामन्यात लखनौच्या मोहम्मद शमीने गोलंदाजीत कहर केला. हैदराबादच्या फलंदाजांना फटकेबाजी करण्यापासून रोखलं.

आयपीएल 2026 स्पर्धेत सनरायझर्स हैदराबादच्या फलंदाजांना मोहम्मद शमीच्या गोलंदाजीचा भेदक मारा सहन करावा लागला. त्याच्या भेदक गोलंदाजीमुळे पावरप्लेमध्येच डाव कोलमडला. मोहम्मद शमीने 4 षटकात फक्त 9 धावा दिल्या. यात 18 चेंडू निर्धाव टाकले. यात दोन महत्त्वाच्या विकेट काढल्या. (Photo: Sunrisers Hydrabad Twitter)

मोहम्मद शमीने पहिल्या षटकापासूनच सनरायझर्स हैदराबाद संघावर दबाव टाकला. पहिलं षटक टाकताना समोर ट्रेव्हिस हेड होता. त्याला पहिले तीन चेंडू निर्धाव टाकले. त्यानंतर चौथ्या चेंडूवर त्याने धाव घेत अभिषेक शर्माला स्ट्राईक दिली. त्याने पाचवा चेंडू निर्धाव घालवला आणि सहाव्या चेंडूवर त्याची विकेट मिळाली. या षटकात फक्त 1 धाव दिली. (Photo: Sunrisers Hydrabad Twitter)

संघाचं तिसरं षटक टाकण्यासाठी मोहम्मद शमी पुन्हा आला. या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर त्याने ट्रेव्हिस हेडची विकेट काढली. या षटकात चार चेंडू निर्धाव टाकले. एक वाइड टाकला आणि एक धाव आली. या षटकात फक्त 2 धावा दिल्या. (Photo: Sunrisers Hydrabad Twitter)

संघाचं पाचवं षटक आणि पावरप्लेमधलं तिसरं षटक मोहम्मद शमीला सोपवलं. या षटकात चार चेंडू निर्धाव टाकले. तसेच दोन चेंडूवर प्रत्येकी दोन धावा आल्या. म्हणजेच या षटकात फक्त 4 धावा आल्या. त्याच्या पावर प्लेमधील भेदक स्पेलमुळे सनरायझर्स हैदराबादच्या 6 षटकात फक्त 22 धावा झाल्या. त्याने तीन षटकात फक्त 7 धावा दिल्या (Photo: Sunrisers Hydrabad Twitter)

संघाचं नववं षटक पुन्हा एकदा मोहम्मद शमीकडे सोपवलं. या षटकात चार चेंडू निर्धाव टाकले. तर दोन चेंडूवर प्रत्येकी एक धाव आली. या षटकात फक्त दोन धावा दिल्या. अशा पद्धतीने 4 षटकात मोहम्मद शमीने 2 विकेट काढत 9 धावा दिल्या. त्याचा इकोनॉमी रेट हा 2.20 चा होता. त्यामुळे टीम इंडियात पुनरागमन करू शकतो असा दावा क्रीडाप्रेमींनी केला. तसेच निवड समिती अध्यक्ष अजित आगरकर यांना ट्रोलही केलं. (Photo: Sunrisers Hydrabad Twitter)