
आयपीएल स्पर्धेच्या 19 व्या मोसमाचे क्रिकेट चाहत्यांना वेध लागले आहेत. या 19 व्या मोसमाला 28 मार्चपासून सुरुवात होणार आहे. या निमित्ताने एका हंगामात सर्वाधिक डॉट बॉल टाकणाऱ्या गोलंदाजांबाबत सविस्तर जाणून घेऊयात. (Photo Credit : Tv9 Bharatvarsh)

आयपीएल स्पर्धेतील एका मोसमात सर्वाधिक डॉट बॉल टाकण्याचा विक्रम हा दक्षिण आफ्रिकेच्या डेल स्टेन याच्या नावावर आहे. स्टेन याने 2013 साली सनरायजर्स हैदराबाद या फ्रँचायजीसाठी खेळताना ही कामगिरी केली होती. स्टेनने तेव्हा 17 सामन्यांमध्ये 19 विकेट्स मिळवल्या होत्या. (Photo Credit : Tv9 Kannada)

प्रसिध कृष्णा स्टेन याच्यानंतर या यादीत दुसऱ्या स्थानी आहे. प्रसिधने 2022 साली 200 डॉट बॉल टाकले होते. प्रसिध 2022 साली राजस्थान रॉयल्सचं प्रतिनिधित्व करत होता. प्रसिध यंदाच्या 19 व्या मोसमात गुजरात टायटन्सचं प्रतिनिधित्व करणार आहे. (Photo Credit : PTI)

ऑस्ट्रेलियाचा माजी वेगवान गोलंदाज मिचेल जॉन्सन या यादीत तिसऱ्या स्थानी आहे. जॉन्सनने 2013 साली मुंबई इंडियन्सकडून खेळताना 196 डॉट बॉल टाकले होते. जॉन्सनने त्या मोसमातील 17 सामन्यांमध्ये 24 विकेट्स मिळवल्या होत्या. (Photo Credit : Mumbai Indians Website)

लसिथ मलिंगा याने आपल्या भेदक आणि धारदार बॉलिंगच्या जोरावर आयपीएल स्पर्धेत मुंबई इंडियन्सला विजयी केलं आहे. मलिंगाने 2011 साली पलटणसाठी 195 डॉट बॉल टाकले होते. मलिंगाने तेव्हा 16 सामन्यांमध्ये 28 विकेट्स मिळवल्या होत्या. (Photo Credit : Mumbai Indians Website)

टीम इंडियाचा वेगवान आणि अनुभवी गोलंदाज मोहम्मद शमी पाचव्या स्थानी आहे. शमीने गुजरात टायटन्सकडून खेळताना 2023 मध्ये 193 डॉट बॉल टाकले होते. शमीने तेव्हा एकूण 17 सामन्यांमध्ये 28 विकेट्स मिळवल्या होत्या. (Photo Credit : Tv9 Bharatvarsh)