
क्विंटन डी कॉकचा वर्ल्ड कपसाठी दक्षिण आफ्रिका टीममध्ये समावेश करण्यात आला आहे. कॉकने आयपीएलच्या 17 व्या मोसमातील 9 सामन्यांमध्ये 236 धावा केल्या आहेत.

मार्कस स्टोयनिस टी 20 वर्ल्ड कपमध्ये ऑस्ट्रेलियासाठी खेळताना दिसणार आहे. स्टोयनिसने 17 व्या हंगामात 10 सामन्यांमध्ये 316 धावा केल्या आहेत. तसेच 4 विकेट्सही घेतल्या आहेत.

मॅट हेनरीला न्यूझीलंड संघात टी 20 वर्ल्ड कपसाठी स्थान देण्यात आलं आहे. हॅनरी आयपीएलच्या 17 व्या हंगामात 3 सामन्यांमध्ये 1 विकेट घेतली आहे.

मार्क वूड इंग्लंडसाठी खेळणार आहे. मार्कला आयपीएलच्या 17 व्या मोसमात एका सामन्यातही संधी मिळाली नाही. वूडने आयपीएल कारकीर्दीत 5 सामन्यांमध्ये 11 विकेट्स घेतल्या आहेत.

तसेच नवीन उल हक याचा वर्ल्ड कपसाठी अफगाणिस्तान संघात समावेश करण्यात आला आहे. राशिद खान अफगाणिस्तनाचं नेतृत्व करणार आहे. नवीनने या हंगामात आतापर्यंत 7 विकेट्स घेतल्या आहेत.